ग्रामपंचायत पेंढरी येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तपासणी समितीची भेट*.


प्रतिनिधी धानोरा:⁠-प्रशांत पेदपल्लिवार.


 पेंढरी:- ग्राम पंचायत पेंढरी येथे संतगडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा संत तुकोडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान स्पर्धा सन 2021/2022 अंतर्गत जिल्हा स्तरीय तपासणी समितीने भेट देऊन विविध उपक्रमांची पाहणी केली. या वेळी पंचायत समिती गडचिरोली चे गट विकास अधिकारी श्री साळवे साहेब,कृषी अधिकारी पदा साहेब,शेंडे म्याडॉम्म स्वच भारत अभियान हे तपासणी समितीकडे समनिस्थ्ठ होते.





 या वेळी ग्रामपंचायत अंतर्गत राबविण्यात आलेल्या निर्बंध उपक्रमांची माहिती करण्यात आली. त्या नंतर जी. प.शाळा ,अंगणवाडी,वैयातिक शौचालय,सांडपाणी,व घनकचरा व्यवस्थापन ईंं. कामाची पाहनी करण्यात आली. या वेळी मा. कोमलवार साहेब गट विकास अधीकारी प.स.धानोरा,मा.जुआरे साहेब रवी जांभुळकर ,पेंढरीचे सरपंच श्री पवनजी येरमे,ग्रा.प.सदस्य त्रुशाल येरमे,मंजुशाताई पवार,वनीताताई निकोळे,श्री शिवनकर साहेब ग्रां.से.झाडापापडा,कुंदन मोहुर्लै,अक्षय लेनगुरे,कौशल्या उसेंडी,प्रिया दूग्गा उपस्थीत होते. प्रास्थाविक व आभार प्रदर्शन ग्रा.प.पेंढरीचे ग्रामसेवक श्री सी.के.खुने यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post