संतापजनक: नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षाचा मुलीवर झाला स्कूल बसमध्ये बलात्कार.

भोपाळ :- मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथून देशाला हादवनारी घटना समोर आली आहे. येथील बिलाबंग या प्रतिष्ठित शाळेतील 3 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बस कर्मचाऱ्यांनी केलेल्या गैरकृत्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

या भयंकर बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. स्कूल बसच्या ड्रायव्हरने नर्सरीत शिकणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर बलात्कार केला. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र शाळेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी शाळेचा निष्काळजीपणाही समोर आल्याचे सांगितले. आता तपासानंतर जे पुरावे सापडतील त्यानुसार शाळेवर कारवाई केली जाईल. शाळेने या लाजिरवाण्या घटनेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. घटनेचा तपास सुरु आहे. गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, भोपाळच्या शाळेशी संबंधित घटनेत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून तपासात ते दोषी आढळले आहेत. मात्र शाळा व्यवस्थापनावरही कारवाई केली जाईल.

घटने बाबत पोलिस काय म्हणाले?
भोपाळचे पोलिस आयुक्त मकरंद देउस्कर यांनी सांगितले की, मुलगी शाळेतून परतली तेव्हा तिच्या आईने पाहिले की कोणीतरी तिच्या बॅगेत ठेवलेल्या अतिरिक्त सेटमधील मुलीचे कपडे बदलले आहे. यानंतर आईने आपल्या मुलीच्या वर्गशिक्षिका आणि शाळेच्या मुख्याध्यापकां कडे चौकशी केली, मात्र दोघांनीही मुलीचे कपडे बदलले नसल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित चिमुकलीने प्रायव्हेट पार्टमध्ये दुखत असल्याची तक्रार केली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की तिच्या पालकांनी तिला विश्वासात घेतले आणि तिचे समुपदेशन केले, त्यानंतर तिने सांगितले की बस चालकाने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिचे कपडे देखील बदलले.

पोलिस आयुक्तांनी सांगितले की, पालक तक्रार करण्यासाठी दुसऱ्या दिवशी शाळेत अधिकाऱ्यांकडे गेले, मुलीने आरोपी ड्रायव्हरला देखील ओळखले. धक्कादायक बाब म्हणजे, त्यावेळी महिला मदतनीस बसमध्ये उपस्थित होती. सहाय्यक पोलिस आयुक्त (एसीपी) निधी सक्सेना यांनी सांगितले की मुलीच्या पालकांनी सोमवारी पोलिसात तक्रार दाखल केली, त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. एसीपी म्हणाले की, बस चालक आणि महिला मदतनीस यांना अटक करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६-एबी (१२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस घटनेचे नेमके ठिकाण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पीडितेच्या वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे.

Post a Comment

Previous Post Next Post