सरपंचांनी दिला विधवांना गणपती पूजा आरतीचा मान : आरोग्य प्रबोधिनीचा पुढाकार

देसाईगंज:- 
ग्रामपंचायत कुरुड तालुका देसाईगंज जिल्हा गडचिरोली येथील सरपंच प्रशालाताई अविनाश गेडाम यांनी आरोग्य प्रबोधिनी व महाराष्ट्र एकल महिला पुनर्वसन समिती यांच्या पुढाकाराने विधवा महिलांकडून श्री गणेशजीची आरती व पूजा एकल विधवा महिलांच्या करून एक नवीन आदर्श निर्माण केला.

कोणत्याही परंपरेला छेद हा परंपरा मोडूनच दिला तर परंपरा मोडून समाज पुढच्या टप्प्यावर जातो.आपल्या समाजात विधवा महिलांना धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाते, त्यातून त्यांच्यातील उपेक्षेची भावना अधिकच वाढून एकटेपणा गडद होतो. 
 समजुतींना धक्के देत हळूहळू सुधारणा करत पुढे नेणे व त्यात समानतेची भावना आणणे महत्वाचे आहे. त्यातूनच सुधारणा पुढे जातात.


व्हिडियो जरूर बघा



आरोग्य प्रबोधिनी संस्थेद्वारा दोन वर्षापासून सातत्याने विधवांना सामाजिक प्रतिष्ठा मिळावी व त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी हेरंब कुलकर्णी यांच्या नेतृत्वात प्रयत्न केले जात आहेत.
यासाठी मार्गदर्शक श्री अविनाश गेडाम ,आरोग्य प्रबोधिनी चे डॉ सूर्यप्रकाश गभने अर्चना गभने आरती पुराम प्रितीश जांभुळकर यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post