५ सप्टेंबर- शिक्षक दिन स्वयंशासन कार्यक्रम


गणेश काटगाये प्रतिनिधी

केशोरी:- 
 आज दि. ५ सप्टेंबर २०१२ला जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा केशोरी येथे शिक्षक दिन व स्वयंशासन कार्यक्रम घेण्यात आला. इयत्ता ३री व ४ च्या विद्यार्थ्यांनीशिक्षक व शिक्षिकांची भूमिका पार पाडली. यामध्ये मुख्याध्यापक म्हणून कु. जिविका, रुमेश शाहारे तर शिक्षक म्हणून कु पूर्वा लोचनदास ठाकरे, जानवी प्रभाकर लाखनकार, खिमेश प्रमोद गोटफोडे भाविक विनोद नंदरचने कुणाल दिपक शेंडे, तन्मय संजय देशकर, वंश गुणेश काडगाये, अथर्व किशोर लोखंडे, नाज़िया आसिबखा पठाण, हिना अविनाश देशकर जिया हिरकचंद लाडे, आरुही दिवाकर चवरे, ईशांत विनोद शेंडे, हर्षद राज्यपाल चवरे यांनी भूमिका पार पाडली

"भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्टान यांचा जन्मदिवस, शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पी एन जगझापे मुख्याध्यापक हे होते तर पी पी कोहडे व प्रमुख पाहूणे म्हणून जी. बी. बडोले एच. एस पवनकर जी के बिसेन भावना नंदेश्वर होते.

सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पन करण्यात आली. मुख्याध्यापक पी. एन जगझापे चीनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या, जिवनकार्याचा परिचय करून दिली .कार्यक्रमाचे जी. के. बिसेन संचालन व आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post