शिक्षक दिनाचे खरे मानकरी - महात्मा ज्योतिबा फुले

   देशभरात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून शासकीय पातळीवर साजरा केला जातो.
       
  एकोणिसाव्या शतकात शुद्र बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना शिक्षणाचा हक्क देणारे पाहिले भारतीय समाजसुधारक म्हणजे फुले दाम्पत्य . महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म ११ ऑगस्ट१८२७ तर राधाकृष्णन यांचा ५ सप्टेबर १८८८ यानुसार डॉ. राधाकृष्णन हे फुल्यांपेक्षा तब्बल६० वर्षांनी लहान होते .
      प्रस्थापित व्यवस्था ही स्त्रीला अबला समजणाऱ्या मानसिकतेचि व्यवस्था होती. स्त्री केवळ चुल आणि मूल याच गुरफटलेली . मनुस्मृतीने तिचे एकूणच मानवी हक्क नाकारून तिला भोग वस्तू या पलिकडे पाहिले नाही . तिला सती जाण्यास भाग पाडणे, जबरदस्तीने तिचे केशवपण करुन तिला विद्रप बनवून तिचा नाकारलेला शिक्षण हक्क फुल्यांनी मिळवून दिला .
वरील सर्व स्थितीचा बारकाईने अभ्यास करून महात्मा फुलेंनी या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सन १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील भिडेवाड्यात स्थापन करून स्त्रियांना पुरुषाप्रमाणेच समानतेचा दर्जा दिला.स्त्रियांचा खरा धर्म त्यांना शिक्षण देणे होय. स्त्रियांच्या मानसिकतेसाठी व सक्षम स्त्री घडवण्यासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे ओळखून म. फुलेंनी आपल्या पत्नीस शिक्षण देऊन आदयशिक्षिका बनवून या क्रांतीकारी कार्याची सुरुवात केली . आणि एका वर्षात २० शाळा सुरू केल्या.
    त्याच बरोबर शिक्षणांचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण होय,आणि ते सक्तीचे करणे काळाची गरज होती, भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने १८८२ साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला होता .सर हंटर महाराष्ट्रात आले तेंव्हा पुणे येथील एम्.एम्.कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले.तेंव्हा १९ ओक्टोबर १८८२ रोजी राष्ट्रपिता जोतीराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले त्यामध्ये जोतीराव फुले म्हणतात की , बहुजनांच्या मुलांना वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणांरा महसूल बहुजनांचा आहे या महसुलावर उंचवर्णीय शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात हे कटुसत्य जोतीराव फुले यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. 
  आपल्या देशातील बहुजन समाज अडाणी आहे. शिक्षणाशिवाय त्यांची उन्नती होणार नाही.ज्या राष्ट्रात सामजिक आणि आर्थिक गुलामी असते तिथे राष्ट्रवाद निर्माण होऊ शकत नाही. हे राष्ट्रपिता फुले जाणून होते .
        शिक्षण हा मानवांचा तिसरा डोळा मानला गेला,महात्मा फुलेंनी या तिसऱ्या डोळ्याला अधिक भक्कम केलं,सर्व बहुजन समाजाचा तिसरा डोळा उघडला. १९६४-६६ दरम्यान कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रांचा अवलंब जरी केला असला तरी महात्मा फुलेंनी ७७ वार्षपूर्वी त्रिभाषा सूत्रांचा अवलंब शिक्षणात करावा यावर अधिक भर दिले. शिष्यवृत्ती व वसतीगृहाच्या सुविधा असो व यासाठी लागणारे सर्व सामग्री स्वतः महात्मा फुलेंनी आपलं सर्वस्व पणाला लावून आयोजन केले, फुले हे स्वतः स्थापत्य अभियंता होते,खडकवासला धरण, कात्रज घाट, पुण्यातील, अनेक पुल, छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल(मुंबई)इ. सारखे अनेक वास्तूंची उभारणी त्यांनी केली त्यातून मिळालेला सगळा पैसा त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी खर्ची घातला. समाजाकडून कुठलेच वेतन न घेता फुले दाम्पत्यांनी शैक्षणिक कार्य करुन शिक्षणाची गंगा आम्हा सामान्यांपर्यंत वाहून आणली, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या माऊलीने तर प्रस्थापित व्यवस्थेशी लढा दिला.स्वतः वर शेण दगड खाऊन देखील त्यांनी स्त्री शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. पतीच्या खांद्याला खांदा देऊन शेवटच्या स्वासापर्यंत त्यांना हा लढा कायम ठेवला . 
      

 २०१६ साली महाराष्ट्र शासनाने महात्मा फुले यांना भारतरत्न देण्यात यावा यासाठी प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात आले होते. मात्र त्यावर आजवर काहीच हालचाल झालेली दिसत नाही. महात्मा फुलेंच्या सुधारकीय विचारांना मानणारा वर्ग आज वाढतो आहे . त्यामुळे समस्त बहुजनांचा खरा शिक्षक दिन म्हणजे महात्मा फुलेंचा स्मृती दिनीच आहे . फुले दाम्पत्यांचे शैक्षणिक कार्य पाहता तेच शिक्षक दिनाचे खरे मानकरी ठरतात .

Post a Comment

Previous Post Next Post