बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकर्ता मेळावा अंतर्गत.. आरमोरी विधानसभेमध्ये बहुजन समाज पार्टीचे शक्तिप्रदर्शन

अश्विन बोदेले
प्रतिनिधी
सुपरफास्ट बातमी

रॅलीचा व्हिडियो

👇👇👇👇👇👇👇


आरमोरी/ गडचिरोली:- बहुजन समाज पार्टी जिल्हा कार्यकर्ता मेळावा दिनांक 4 /9 /2022 ला आशीर्वाद मंगल कार्यालय गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला होता.
 



या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आरमोरी विधानसभेमध्ये जिल्हा प्रभारी प्रदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आरमोरी विधानसभा कार्यकारिणी यांच्या मोटबांधनी सहकार्याने येथील आरमोरी विधानसभा अध्यक्ष कृपानंदजी सोनटक्के, जिल्हा सचिव भुजंगराव पात्रीकर, विधानसभा महासचिव जयद्रथ बोदेले, विधानसभा कोषाध्यक्ष दिनेश वालदे, विधानसभा सचिव ईश्वर बारसागडे, महिला संयोजिका कल्पना बरडे, जेष्ठ कार्यकर्ते मनोज कुमार खोब्रागडे, माजी विधानसभा अध्यक्ष सिद्धार्थ घुटके, बी.व्ही.एफ. संयोजक खुशाल लिंगायत, विधानसभा सचिव अश्विन बोदेले, बि.व्हि.एफ. सहसंयोजक नरेश शेंडे,
 विधानसभा उपाध्यक्ष सुधीर मेश्राम व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते ज्ञानेश्वर सहारे, देवा कोटांगले, तुफान कोटांगले, खोमसागर खोब्रागडे, मन्साराम कन्नाके ,दूर्वास सहारे, अशोक सहारे ,चंद्रशेखर साखरे, डॉ. जांभुळकर, जितेंद्र टेंभुर्ने, भीमराव बारसागडे, धनपाल सांगोडकर ,जयदेव चौधरी, पंढरी टेंभुरने, महेंद्र खोब्रागडे, दिलीप सहारे, चांगदेव टेंभुरने,त्रिरत्न खोब्रागडे यांच्या नेतृत्वात वैरागड, ठाणेगाव ते गडचिरोली पर्यंत फोरविलर रॅली काढून ,नारे देऊन ,समाजात चेतना निर्माण करण्याचे कार्य केले.




या कार्यकर्ता मेळाव्याला अहेरी, गडचिरोली, आणि आरमोरी विधानसभेतील पदाधिकारी, कार्यकर्ते ,बहुजन समाज पार्टीचे हितचिंतक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.




 या जनसमुदायाला महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष ऍड. संदीप ताजने, महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी नितीन सिंग जाटव , राज्यसभेचे खासदार अशोक सिद्धार्थ, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्रमोद रैना, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुनील डोंगरे, प्रदेश सचिव डी. एस .रामटेके ,प्रदेश सचिव विजयकुमार डहाट नागपूर, जिल्हा बामसेफ संयोजक प्रा. रामराव नन्नावरे ,जिल्हा प्रभारी प्रदीप खोब्रागडे, जिल्हा प्रभारी गणपतजी तावाडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, जिल्हा सचिव भुजंगरावजी पात्रीकर या सर्वांनी आपल्या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांना "शासक बनो" असे आवाहन केले.
 व उपस्थित जनसमुदायात चेतना निर्माण केली. या कार्यकर्ता मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, व सर्व विधानसभा पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.





Post a Comment

Previous Post Next Post