अखेर मुरुमगाव येथील धान घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल

धानोरा : तालुक्यातील मुरुमगाव अविका येथे 9,800 क्विंटल धान्य घोटाळा झाला. या आशयाचे वृत्त 16 ऑगस्ट 2022 ला प्रकाशित होताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली. वृत्त प्रकाशित होऊन 12 दिवस झाले असताना सुद्धा कोणतेही अधिकारी किंवा अविका संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेले नव्हता. मात्र कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी प्रादेशिक कार्यालय धानोरा येथील उप व्यवस्थापक धीरज सुंदरलाल चौधरी व प्रतवारीकर तथा विपणन निरीक्षक उपप्रादेशिक कार्यालय धानोरा राहुल कोकोडे यांना निलंबित करण्यात आले. अखेर आरोपी विरोधात मुरुमगाव पोलीस मदत केंद्रात 31 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार तपास अधिकारी बावणे उपप्रादेशिक व्यवस्थापक कुरखेडा यांनी 18 ऑगस्ट 2022 रोजी मुरुमगाव येथिल आविकात घोटाळा झाल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर मुरुमगाव येथील पोलीस मदत केंद्रात आविका सचिव एल.जी.धारणे, केंद्रप्रमुख गुरुदेव धारणे, शंकर कुमरे, राहुल कोकोडे प्रतवारीकर विपणन निरीक्षक, संस्थेचे अध्यक्ष व संचालन मंडळ आणि अज्ञात व्यापारी यांच्या विरोधात तपासाअंती 3 करोड 2 लाख 56 हजार 298.34 पैसे रुपयाची अफरातफर केल्याप्रकरणी वरिल सर्वावर 31 ऑगस्ट 2022 रोजी 420,406,409, 34 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा मुरुमगाव पोलीस मदत केंद्र येथे दाखल करून धानोरा पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आला आहे. परंतु बातमी लिहेस्तव अजूनही कोणाला अटक करण्यात आली नाही हे विशेष. या प्रकरणात कोणाला वाचवण्याचा प्रयत्न तर होत नाही ना ? अशी चर्चा मुरुमगाव येथील नागरिकांमध्ये सुरु आहे. कर्तव्यात कसुर केल्या प्रकरणात दोघाना निलंबित केले मात्र फक्त कोकोडे

यांच्या वर गुन्हा दाखल झाला व उप प्रादेशिक व्यवस्थापक धिरज चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. तसेच आविकाचे व्यवस्थापक धारणे मुरुमगाव येथुन फरार असल्याची खमंग चर्चा परिसरात सुरु आहे. सदर गुन्ह्याचा तपास मुरुमगाव पोलीस मदत केंद्राचे तपास अधिकारी जी. एन. आठवे हे करीत आहे.

"यासंदर्भात मुरुमगाव पोलीस मदत केंद्राचे तपास अधिकारी गणेश आठवे यांना प्रत्यक्षात विचारले असता. वरिष्ठांची संपर्क करून संबंधित आरोपीला लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे सांगितले.”

Post a Comment

Previous Post Next Post