लग्नाचे आमिष दाखवत विवाहितेवर अत्याचार, २ कोटीही उकळले

औरंगाबाद - औरंगाबादमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका विवाहीत महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याकडून तब्बल २ कोटी रुपये उकळण्यात आले आहेत. संतापजनक बाब म्हणजे हे सगळं करणारा आरोपी राजकाणातील शिंदे गटाचा समर्थक आहे. त्याने महिलेला ब्लॅकमेलही केले, तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर तिचा गर्भपात केला आणि नंतर जीवे मारण्याची धमकी दिली.मिळालेल्या माहितीनुसार, युवासेनेचा पदाधिकारी राहिलेला आणि आता शिंदे गटामध्ये सामील झालेला कट्टर शिंदे गट समर्थक ज्योतीराम विठ्ठल धोंगडे-पाटील याने एका विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आरोपावरून औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने पीडितेकडून जवळपास दोन कोटी रुपये उकळले आहेत. त्यासोबतच पीडिता गर्भवती राहताच तिचा गर्भपात करुन नंतर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजळनक प्रकार समोर आला आहे.

पीडितेच्या तक्रारीवरुन मुकुंदवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा अधिक तपास करतायत. ज्योतीराम धोंडगे-पाटील हा महापालिकेच्या टँकरने जयभवानीनगर भागात पाणी पुरवठा करत होता. पाणी पुरवठा करताना त्याची एका महिलेसोबत ओळख झाली. पाणी पुरवठ्याच्या निमित्ताने दोघांचे एकमेकांना फोन आणि मॅसेजेस सुरू झाले, दोघांची ओळख अधिक वाढत गेली. ज्योतीराम याने त्या महिलेच्या पतीसोबतही मैत्रीचे संबंध निर्माण केले. यानंतर त्या महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. एप्रिल २०१९ मध्ये दौलताबाद परिसरातील हिरण्य रिसॉर्ट येथे त्या महिलेला फिरायला नेले, तिथे दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. यावेळी आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओही शूट केला.

Post a Comment

Previous Post Next Post