महिला आंघोळ करत असताना आरोपीने मागून जाऊन केली तिची हत्या ,नंतर त्याने तिच्यावर केला बलात्कार

आसाम:- नाल्यावर आंघोळीसाठी गेलेल्या 42 वर्षीय महिलेची हत्या करून नंतर तिच्या मृतदेहासोबत बलात्कार करण्यात आल्याचा घृणीत प्रकार आसाम मधील उदलगुरी येथे घडला आहे. या प्रकरणात एका 23 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाला गावातील एका गटाने वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला पण महिलेच्या कुटुंबियांच्या मागणी नंतर पोलिसांनी प्रकरण हाताळले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपीने उदलगुरी सदर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि नंतर बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. ही महिला 25 ऑगस्ट रोजी जवळच्या नाल्यात आंघोळीसाठी गेली असताना ही घटना घडली.

एका गावकऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, या क्रूर घटनेमागे गावातीलच कोणीतरी असू शकते. यावर महिलेच्या पतीला सुरुवातीला खात्रीच नव्हती. गावकऱ्याने सांगितले की, आम्हाला माहिती मिळाली की, महिला आंघोळ करत असताना आरोपीने मागून जाऊन तिची हत्या केली. नंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. पण सुरुवातीला, चित्र धुसर होते आणि म्हणूनच तिचा पती गंभीर कायदेशीर लढाईसाठी तयार नव्हता. कारण गावकरी आरोपीला ओळखू शकले नाहीत.

पोलीस सूत्रांनी सांगितले की, महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर लगेचच गावातील एका लॉबीने अलौकिक शक्तीच्या प्रभावाखाली तिचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवून या घटनेला रंग देण्याचा प्रयत्न केला. मात्र पीडितेच्या कुटुंबीयांच्या चौकशीच्या मागणीनंतर आणि पोलिसांच्या तपासासाठी तिचा मृतदेह दफनभूमीतून बाहेर काढण्यात आला. उदलगुरी एसपी सुप्रिया दास यांनी सांगितले, “पीडितेचा मृतदेह मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. आरोपीविरोधात आयपीसीच्या कलम 376/302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आम्ही शक्य तितक्या लवकर हे प्रकरण तार्किक निष्कर्षापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि खटला चालवू

Post a Comment

Previous Post Next Post