गडचिरोली येथे तलावात पडून वृद्धेचा मृत्यू

गडचिरोली : तलावाच्या पाळीवरून मार्गक्रमण करताना तोल जाऊन तलावात पडून वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास शहरातील चंद्रपूर मार्गावरील मुख्य तलावात निदर्शनास आली.

सुमित्रा केशव वाढई (८०) गोकुलनगर असे मृतक महिलेचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, सुमित्रा ही वृद्धापकाळाने नेहमीच आजारी असायची. तिचे नातेवाईक फुले वॉर्डात राहत होते. त्यांना भेटण्यासाठी ती तलावाच्या पारीवरून जात असताना ती तलावात पडली. यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिचे प्रेत पाण्याबाहेर काढले. घटनेसंदर्भात गडचिरोली पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.नागरिकांनी घटनास्थळावर धाव घेतली 

Post a Comment

Previous Post Next Post