बापरे बाप..... शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले तब्बल १०० कोटी रूपये....

नागभीड :- तालुक्यातील मांगली येथील रहिवासी राजू देवराव मेश्राम (४०) हा मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. त्याचे बँक आँफ इंडियाच्या नागभीड येथील शाखेतखाते असून, गुरुवारी त्याच्या या बँक खात्यात गुगुल पेच्या माध्यमातून तब्बल ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा झाले.

तसा संदेश बँकेकडून त्याच्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाला. तो संदेश बघून क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. त्याने गावात काही नागरिकांनाही याबाबतची माहिती दिली. त्यामुळे गावातही याविषयी चर्चा सुरू झाली. दरम्यान, शुक्रवारी बँक ऑफ इंडियाच्या नागभीड शाखेतून राजू मेश्राम यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी तुमच्या बँक खात्यात ९९ कोटी ९८ लाख १०६ रुपये जमा करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच इतक्या मोठ्या रक्कमेचे विवरण सादर करण्यास सांगण्यात आले.



 बँक अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर राजू मेश्राम घाबरला. लगेच आपल्या एका सहकाऱ्यासह बँकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हा बँक अधिकाऱ्यांनी खात्यात जमा झालेल्या रकमेबाबत विचारणा केली असता, मेश्रामने प्रामाणिकपणाने ही रक्कम आपली नसून चुकून आली असावी, असे बँक अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे बँक अधिकाऱ्यांनी नंतर ज्या खात्यातून ती रक्कम आली त्याच खात्यामध्ये ती रक्कम वळती केल्याची माहिती आहे.

अचानक एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्याचे बघून राजू मेश्रामही गर्भगळीत झाला होता. मात्र ती रक्कम आपली नसल्याचे सांगून त्याने प्रामाणिकपणा दाखविल्याने त्याचेही कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post