देसाईगंजचे चार जण सेक्स रॅकेटमध्ये आरोपी


देसाईगंज : सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे गाजत असलेल्या सेक्स रॅकेट प्रकरणात देसाईगंज येथील चार आरोपींचाही सहभाग असल्याचे समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

त्या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परप्रांतातून अल्पवयीन मुलींना आणून त्यांच्याकडून देहव्यापार केला जात असल्याचा प्रकार ब्रह्मपुरी येथे उघडकीस आला आहे. तेथील विदर्भ इस्टेट कॉलनीतील एका भाड्याच्या घरात तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात असल्याचा प्रकार लोणारे दाम्पत्याकडून सुरू होता.


याप्रकरणी मनजित आणि चंदा लोणारे यांना अटक केल्यानंतर देसाईगंज येथील अरविंद इंदूरकर, शिवराम हाके, राजकुमार उंदीरवाडे, मुकेश बुरांडे यांचीही नावे समोर आली असल्याचे ब्रह्मपुरी पोलिसांनी सांगितले. अटकेतील आरोपी पीसीआरमध्ये असून या प्रकरणात आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post