धानाला योग्य भाव आणि बोनस जाहीर करा मोहझरी येथील शेतकऱ्यांची प्रमुख मागणी

मोहझरी:- भारत हा कृषिप्रधान देश असल्यामुळे भारतातील अनेक शेतकरी शेतीवर अवलंबून आहेत. परंतु मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड भोगावा लागत आहे .सध्या गडचिरोली जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत आहे.


सगळीकडे खताचे, कीटकनाशक दर तसेच इतर शेतीच्या कामांमध्ये मजुरी मोठ्या प्रमाणात वाढत आहे . शेतकऱ्यांना धानाचा उत्पादन यावर्षी मोठ्या प्रमाणात होईल अशी आशा बाळगून शेतकरी वर्षभर नियोजन करीत असतात. परंतु विद्यमान सरकार धानाला अजून पर्यंत बोनस जाहीर केलेला नाही त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. तसेच शेतीच्या एक एकर शेती करतो म्हटला तर जवळपास 25 हजार रुपये खर्च येतो पण धानाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेती करणे शेतकऱ्याला परवडत नसल्याचे चित्र सध्या परिस्थितीमध्ये दिसत आहे. त्यामुळे वरील बाबीची गंभीरपणे विचार करून धानाला योग्य भाव आणि बोनस द्यावा अशी मागणी आरमोरी तालुक्यातील मोहझरी येथील शेतकरी पुरुषोत्तम वसाके, प्रमोद गुरनुले , रामदास गुरनुले, सुशील जांभुळकर, प्रकाश टेंभुर्ण, हिवराज मोहुरले, लालाजी मोहुरले, अश्या अनेक शेतकऱ्यांनी  शासनाकडे केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post