अहेरी तालुक्यातील पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांना एक लाखाची लाच घेतांना रंगेहाथ अटक

गडचिरोली :- जिल्ह्याची राजनगरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अहेरी तालुक्यातील पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांना आज एक लाखाची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात लाच प्रतिबंधक पोलिसांना यश मिळाले.

एका वाहतूक ठेकेदाराला नियमित वाहनाची वाहतूक करण्यासाठी आणि वाहतूक ठेकेदारावर असलेल्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयाची मागणी केली होती, परंतु वाहतूक ठेकेदाराला लाचेची रक्कम द्यायची नसल्याने त्यांनी लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली होती.

देवाला... सर्व कळतय र... व्हिडियो
👇👇👇👇👇👇👇👇👇



मिळालेल्या तक्रारीवरून शहानिशा करून पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांच्या कडे तक्रार दाराला पाठविण्यात आले होते. पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांनी तक्रारदार यांना सदर लाचेची रक्कम आपल्या सरकारी गाडीत ठेवण्यास सांगितले, त्या वरुन रक्कम ठेवताच आरोपी पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांना एक लाखाच्या रक्कमेसह चंद्रपूर जिल्ह्यातील लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजताच्या सुमारास रंगेहाथ अटक केली आहे.


गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच पोलिस निरीक्षक पदाच्या अधिकाऱ्याला आज रंगेहाथ पकडण्यात आले असल्याची बातमी कळताच पोलिस विभागात मोठी खळबळ माजली असून आरोपी पोलिस निरीक्षक शाम गव्हाणे यांच्या चौकशीत पुढे किती घबाड बाहेर निघतो याकडे आता लक्ष वेधले आहे.

सदर कारवाईत लाच प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर जिल्ह्यातील लाच प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वी कामगिरी पार पाडली होती.

Post a Comment

Previous Post Next Post