आम आदमी पार्टी नरखेड व महिला बचत गट संयुक्तपणे वाढत्या महागाई विरोधात जन आक्रोश रैली

महागाईच्या विरोधात तहसीलदाराना आपचे निवेदन 


राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता.16


दि.15 सप्टेंबर 2022 रोज गुरुवारला आम आदमी पार्टी नरखेड व महिला बचत गट यांच्या संयुक्तपणे गणेश रेवतकर नागपूर जिल्हा संयोजक यांच्या नेतृत्वात वाढत्या महागाईविरोधात जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले. आज वाढत्या महागाईवर नरखेड शहर संयोजक लीलाधर कळंबे यांनी प्रकाश टाकला व वाढता भ्रष्टाचारावर विनोद क्षीरसागर यांनी आपले विचार मांडले. जर दिल्लीमधील मोफत दिल्या जाऊ शकते तर नरखेड मध्ये का मिळू शकत नाही. यावर आपले विचार व्यक्त केले. नरखेड मध्ये सरकारी शिक्षण व्यवस्था ही किती खालावलेली आहे त्याबद्दल शंकर म्हेत्रे यांनी आपला रोष व्यक्त केला. आटा चक्की चे वाढलेले दर कमी करण्यासाठी ममताताई गोरखेड़े महिला बचत गट प्रमुख यांनी महिलांची मागणी व्यक्त केली.आम आदमी पार्टी कार्यालय नरखेड येथून सौ. संध्याताई गजबे यांनी प्रस्तावना करून रॅली ला सुरुवात केली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला जनार्दन कडवे यांच्याद्वारे माल्यार्पण करून रॅली बाजार चौक नरखेड. येथून समोर जाऊन स्वामी विवेकानंद चौक येथे तरुण बालपांडे यांच्या द्वारे स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याचे माल्यार्पण केले तथा संगीताताई ढवळे शत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून तहसीलदार नरखेड यांना खालील विषया बद्दल निवेदन देण्यात आले.
    


 गैस सिलेंडर दर वाढ, इतर राज्यापेक्षा वीज दर वाढ, नरखेड मधील खालवलेली शिक्षण व्यवस्था व निम्न दर्जाची स्वास्थ्य सुविधा यावर मुख्यमंत्री साहेब यांनी त्वरीत विचार करून जनहिताचे निर्णय घ्यावे व आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. असा इशारा आम आदमी पार्टी नरखेड च्या वतीने देण्यात आले. राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले.या मोर्चामध्ये प्रमुख्याने रवींद्र काटे, बुद्धा मुलताईकर, प्रकाश नारनवरे, जगत जीवन कोरडे, संजय गजभिये, घनश्याम गायधने, रवीना उईके, हीना नासरे, संगीता नेहरे, सागर बडोदेकर, महेश नरवरे, धनराज बेलकडे, मीडिया प्रमुख सुनील बरोले, सुनिता हुंगे, ललिता शिव हरे, मीना लाडेकर, अर्चना कळंबे, पुष्पाताई ढोके, लक्ष्मीबाई बारई, कमला कोरडे, सुनिता उईके प्रतिभा ढोबळे, शिल्पा राऊत, सुनिता बागडे, कोमल कजबे, माया नगराळे, शकुन सातपुते, शितल काळमेघ, दुर्गा पगारे. आदी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post