शेजाऱ्याचे महिलेशी अश्लील चाळे

नागपूर. छतावर कपडे वाळविण्यासाठी गेलेल्या शेजारी महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अमोल वसंत येवले (28) असे अटकेतील तरुणाचे नाव आहे. पीडित 53 वर्षीय महिला आणि आरोपी अमोल एकमेकांच्या शेजारी राहतात. मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास पीडित महिला आपल्या घराच्या छतवर कपडे वाळविण्यासाठी गेली होती. यावेळी अमोलही त्यांच्या मागे छतावर गेला. त्यांना पाहून अश्लील इशारे करू लागला. महिलेने त्याला फटकारले असता बळजबरी करण्याचा प्रयत्न करू लागला. पीडितेने त्याला धक्का देऊन आरडा-ओरड सुरू केली. पकडले जाण्याच्या भीतीने अमोल तेथून पळाला. पीडितेने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि एमआयडीसी ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अमोलला अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post