खाटेवर असलेल्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी चक्क तोडले लचके...

उमरखेड : खाटेवर असलेल्या मृतदेहाचे मोकाट कुत्र्यांनी चक्क लचके तोडले. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी तालुक्यातील धनज येथे उघडकीस आली. घरमालकाच्या प्रकार आल्यानंतर त्यांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावले. या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

ललित शिवाजी मडावी (वय ५२, रा. पळसा, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. तालुक्यातील धनज येथे आदिवासी आश्रमशाळेत ते स्वयंपाकी पदावर कार्यरत होते. त्यांचे कुटुंबीय अमरावती येथे वास्तव्याला आहे. ललित हे धनज येथील तुकाराम बोंबले यांच्या घरी भाड्याने राहत होते. मंगळवारी सकाळी तुकाराम बोंबले घरी लक्षात आले असता त्यांना ललित मडावी राहत असलेल्या खोलीतून कुजल्यासारखा वास आला. शिवाय, कुत्र्यांची आरडाओरडही ऐकू आली. त्यामुळे शंका आल्याने बोंबले यांनी खोलीकडे जाऊन पाहिले, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघड झाला.

Post a Comment

Previous Post Next Post