राज ठाकरे यांचे संत्रा नगरीत जल्लोषात स्वागत ::

आगामी मनपा निवडणूकसाठी स्वबळावर मनसे लढणार 

----------------------------------------

व्हिडियो जरूर बघा
👇👇👇👇👇
  


 नागपुर:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे हे दिनांक 18 सप्टेंबर रोजी संत्रा नगरी नागपूर येथे सकाळी 9 वाजता विदर्भ एक्सप्रेसनी दाखल झाले. तुली एम्पोरियम येथून बाईक रॅली काढून सकाळी 11 वाजता ढोल ताशाच्या गजरात रवि भवन येथे त्याचें जंगी स्वागत करण्यात आले. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नागपूर येथील कार्यकर्तेनी त्याचें जंगी स्वागत केले. नागपूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून मनसे कार्यकर्तेनी राज साहेबाच्या भेटीसाठी एकच गर्दी केली होती. आगामी नागपूर मनपा निवडणूक व नगरपरिषद निवडणुकी साठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील असल्याचे व्यक्त केले. राज साहेबानी निवडणूकी संदर्भात सविस्तर मार्गदर्शन कार्यकर्तेना केले. जिल्ह्यातील अनेक समस्या कार्यकर्तेनी त्याच्यापुढे मांडल्या. येत्या निवडणूकित मनसे पक्ष अधिक मजबूत करून मनसेची सत्ता येईल असा भाव मनसे चे अध्यक्ष राज ठाकरे साहेबानी व्यक्त केला.


 सुपर फास्ट बातमी प्रतिनिधी राजेंद्र बागडे नागपूर.

Post a Comment

Previous Post Next Post