भाऊ! खर्रा नको विकू.....38 पानटपरींवर झाली कारवाई

फाईल फोटो

वर्धा:- देवळी तालुक्यातील देवळी तसेच पुलगाव येथील प्रमुख मार्गांवरील ३८ पानटपरींवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कायदा कार्यक्रम, सामान्य रुग्णालयाअंतर्गत कारवाई करण्यात आली. यावेळी १४ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तंबाखू नियंत्रण कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय, वर्धा व अन्न व औषध ती प्रशासन विभाग, वर्धा तसेच पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने देवळी, सेलसुरा (हि.), पुलगाव शहरातील प्रमुख मार्गावर असणारे ३८ पान टपरीवर कारवाई करण्यात आली.

 १४ हजार रुपये दंड वसूल करून काही साहित्यही जप्त करण्यात आले. ही कारवाई जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सल्लागार डॉक्टर नम्रता सलुजा, समुपदेशक राहुल बुचुंडे, सामाजिक कार्यकर्ता हर्षद ढोबळे, अन्न औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) जयंत वाणे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत लोहार व कर्मचारी, देवळी पोलीस विभाग तर्फ पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या नेतृत्वात सुमित कांबळे, भोयर, पुलगाव पोलीस विभागातर्फे पोलीस निरीक्षक शैलेश शेळके, देविदास डुबळे, चंदू सोनवणे, ललित दूधकोहळे, संदीप शिनपुरे यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post