हत्तींच्या कळपाने धान पिकाची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई देण्यात यावे रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांची उपवनसंरक्षक देसाईगंज यांच्या कडे निवेदनातून मागणी.

 आरमोरी- देसाईगंज तालुक्यातील बोळधा परीसरात जंगली हत्ती दाखल होऊन त्यांनी काल परवा शेतकऱ्यांचे धान पिक लावलेल्या शेतात हैदोस घालुन मोठया प्रमाणावर धान पिक नष्ट केल्याने शेतकऱ्यांवर आथिर्क संकट कोसळलेला असल्यामुळे वनविभागाने तात्काळ हत्तेच्या कळपाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक देसाईगंज यांच्या कडे निवेदनातून केली आहे



देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला कृटुबाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून कोणतेही रोजगार नसल्यामुळे स्वताचे शेतीत लक्ष देऊन चांगले उत्पादन मिळण्याचे जिद्दीने बॅकातुन पीक कर्ज उसवार घेऊन चागल्या प्रतिची धान पिक बिजाई घेऊन बोळधा रावणवाडी येथील शेतकऱ्यांनी पावसाळी धान पिक रोवणी केल्यानतर निद्दा काढुण किटकनाशके व खत व्यवस्थापन करुन आता समोरच्या महिन्यात धान पिक शेतकऱ्यांच्या पदरी पडणार होते परंतु गेल्या दोन दिवसांपुर्वी कुरखेडा तालुक्यातुन देसाईगंज तालुक्यातील बोळधा रावणवाडी परीसरतात जंगली २३ हत्ती कळप येऊन शेतकऱ्यांच्या धान पिकाची नुकसान केल्याची माहिती शेतकऱ्यांनी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांना दिली असता आज देसाईगंज तालुक्यातील बोळधा रावणवाडी परीसरातील भेट देऊन हत्तीच्या कळपाने नुकसान केलेल्या शेतकरी सकाराम शेंद्रे बकाराम शेद्रे तुकाराम शेद्रे रुषी मेत्राम होमराज वाघाडे पंढरी मेत्राम धनिराम मेत्राम मनोहर नेवारे नानाजी गायकवाड यासह अनेक शेतकऱ्यांच्या धान नुकसानीची पाहणी केली असता काही दिवसांत हातात येणारे धान पिक पुणता नष्ट केल्याने शेतकऱ्यांवर आथिर्क डोंगर कोसळुन उसवार कज कृटुबाचा गाडा कशाने चालवणार या विवंचनेत शेतकरी सापडला असल्यामुळे वनविभागाने हत्तीच्या कळपाने धान पिकाची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरीव भरपाई देण्यात यावी अशी मागणी रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपवनसंरक्षक देसाईगंज यांच्या कडे निवेदनातून केली आहे.
यावेळी महादेव कुमरे सैलेश बगमारे प्रितम ढोडणे सुनिल कुमरे सकाराम शेद्रे बकाराम शेद्रे उपस्थित होते.
.

Post a Comment

Previous Post Next Post