तो पुन्हा आला... वाघाच्या हल्ल्यात आवळगाव येथील महिला ठार


1️⃣ ब्रह्मपुरी:- प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील धृपदा श्रावण mohurle वय 65 वर्ष ही महिला शेतामध्ये शेतीचे कामे करण्याकरीता गेली होती . तिथे ती धानाचा निंदा काढत असताना  अचानक त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने धृपदा mohurle (मोहूर्ल) यांच्यावर हल्ला करून ठार करुन जंगलात नेल्याची घटना आज दुपारी 1.00 वाजता उघडकीस आली.

त्यामुळे आवळगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी वन विभागाने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.


⛔ *ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथे वाघाच्या हल्ल्यात महिला ठार*

🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

 *व्हिडिओ बघून सबस्क्राईब करून शेअर करा*
⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️



*अँकर:- छबिला सहारे...* 

📛📛📛📛📛📛📛📛



2️⃣ वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेस गंभीर जखमी

गडचिरोली ,  : जिल्ह्यात वाघाचे मानवावरील हल्ल्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. शेतात गवत कापत असतांना वाघाने हल्ला करून शेतकरी महिलेस गंभीर जखमी केल्याची घटना आज 27 सप्टेंबर रोजी दुपारी 02.30 वाजताच्या सुमारास चामोर्शी तालुक्यातील गिलगाव शेतशिवारत घडली. सुमनबाई डोकाजी भोयर (60) मु.पोस्ट गीलगाव ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे जखमी महिलेचे नाव आहे. सुमनबाई डोकाजी भोयर ह्या नेहमीप्रमाणे शेतात गेल्या होत्या. आज शेतात गवत कापत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला यात त्या गंभीर जखमी झाल्या. तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचाराकरिता दादाराव चव्हाण यांच्या वाहनाने हलविण्यात आले असून उपचार सुरु आहे. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post