शेळी चोर समजुन दोन तरुणांना गावकऱ्यांनी केली बेदम मारहाण...

सडक अर्जुनी,:- चोर समजून दोन गावकऱ्यांनी चांगलाच चोप दिल्याची घटना तालुक्यातील खडकी बाम्हणी गावात घडली आहे. अखेर डूग्गीपार पोलिसांना स्वाधिन केल्यानंतर गावकारी निघाल्याने पोलिसांनी त्यांना सोडले आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

खडकी बाम्हणी गावात मागील 10 दिवसांपासून शेळ्या चोरीच्या घटना सुरू आहेत. जीवापाड पाळलेल्या शेळया सातत्याने चोरी जात असल्यामुळे गावकरी दहशतीमध्ये आहे. त्यामुळे गावात अनोळखी व्यक्ती आला की, त्यांची विचारपूस केली जाते. बुधवारी गावात दोन अनोळखी व्यक्ती आले होते. गावकऱ्यांनी त्यांना गावात येण्याचे कारण विचारले. मात्र त्या दोनही तरुणांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे हेच दोन्ही लोक शेळ्या चोरणारे युवक असावेत, असा गावकऱ्यांचा समज झाला. त्यांनी त्या संशयावरून दोन्ही व्यक्तींना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. त्यांनतर डूग्गीपार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्या युवकांची विचारपूस केली. ते चोर नव्हतेच, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले. मात्र गावकरी समाधानी नव्हते. अखेर पोलिसांनी गावकऱ्यांना बाहेर काढले. जमाव परतल्यानंतर पोलिसांनी त्या दोनही तरूणांना सोडून दिले.

Post a Comment

Previous Post Next Post