प्रतीक्षा संपली...शेतकऱ्यांना 'या' तारखेला PM किसानचे मिळणार पैसे


नवी दिल्ली,

पीएम किसान Farmers सन्मान निधी (पीएम किसान) च्या 12 व्या हप्त्याची प्रतीक्षा आता लांबली आहे. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या बातम्यांनुसार, केंद्रातील मोदी सरकार लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, योजनेचा 12 वा हप्ता 30 सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो. तसेच गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकू शकतात. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.


दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी Farmers अद्याप पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी केलेले नाही, त्यांची माहिती अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहितीनुसार, शेतकरी अजूनही OTP आधारित ई-केवायसी करू शकतात. यापूर्वी ई-केवायसी आयोजित करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2022 ही निश्चित करण्यात आली होती, परंतु आता केंद्रातील मोदी सरकारने यासाठीची तारीख बंधनकारक रद्द केली आहे. आता शेतकरी बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी घेतल्यानंतर जवळच्या लोकसेवा केंद्राला भेट देऊन पुढील हप्ता मिळवू शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post