मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षकांनी काढला पळ, गुजरातमधील सभेचा Video Viral

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी अलिकडेच हिमाचल प्रदेशचा दौरा केला होता. तिथे त्यांनी एक सभा देखील घेतली होती. पण मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षक निघून जात असल्याची घटना घडली. या घटनेचे व्हिडीओ देखील इंटरनेटवर व्हायरल होत होते. (Empty Chairs at Narendra Modi Speech) असाच काहीसा प्रकार आता गुजरातमध्ये पाहायला मिळाला. अहमदाबादमध्ये पंतप्रधान भाषण करत असताना पाठीमागे प्रेक्षकांनी मात्र काढता पाय घेतला. सभा सोडून जाणाऱ्या या प्रेक्षकांचा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.


मोदींचं भाषण सुरू होताच प्रेक्षकांनी काढला पळ, गुजरातमधील सभेचा Video Viral
👇👇👇👇👇👇👇



हा व्हिडीओ क्रॉंग्रेसचे सोशल मीडिया एक्सपर्ट नत्ताशा शर्मा आणि नितिन अग्रवाल यांनी ट्विट केला आहे. सोबतच देशात आता परिवर्तन सुरू झाल्याचा उपरोधिक टोला देखील त्यांनी लगावला आहे. या व्हिडीओवर देशभरातील नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. काही मोदी समर्थक या व्हिडीओला फेक म्हणत आहेत. तर काही विरोधक मोदींच्या खोट्या दाव्यांना वैतागून आता लोकांनी काढता पाय घेतला असे टोले मारत आहेत. हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होतोय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी तब्बल ३४०० कोटींच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यावेळी ते अहमदाबाद, गांधीनगर, सूरत, भावनगर आणि अंबाजी या ठिकाणांना भेट देणार आहेत. या ठिकाणी अनेक विकास प्रकल्पांचं भुमीपूजन त्यांच्या हस्ते होणार असून लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत या पार्श्वभूमीवर मोदींचा हा गुजरात दौरा महत्वाचा आहे असं म्हटलं जातेय.

Post a Comment

Previous Post Next Post