पती लॉजवर दुसऱ्या महिलेबरोबर करत होता 'मजा', पत्नीने रंगेहाथ पकडत दिली अशी 'सजा'... Video व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) सध्या एक व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरल होत आहे. परस्त्रीबरोबर लॉजवर जाणं एका पतीला चांगलंच महागात पडलं. पत्नीने अचानक लॉजवर धडक देत पती आणि त्याच्या प्रेयसीला चप्पलने धु धु धुतलं. या घटनेचा पत्नीने व्हिडिओही बनवला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून लोकांच्याही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत काय?

आग्रा व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत पत्नी हातात चपल घेऊन पती आणि त्याच्या प्रेयसीची धुलाई करताना दिसत आहे. पती आणि प्रेयसी दोघंही हात जोडून तिची माफी मागताना दिसत आहेत, पण संतापलेली पत्नी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. ही घटना आगरा इथली आहे. एका व्यक्तीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. दोघंही एका लॉजवर आले होते.

या दोघांच्या संबंधांची पत्नीला संशय होता. तीने त्याच्यावर पाळत ठेवली. पती त्या महिलेला घेऊन लॉजवर गेला. याची माहिती मिळताच पत्नी थेट लॉजवर धडकली, ज्या रुमवर पती आणि त्याची पत्नी होती, त्या रुमवर जात पत्नीने पती आणि त्याच्या प्रेयसीला रंगेहाथ पकडलं. यानंतर दोघांची चप्पलने चांगली धुलाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post