गडचिरोली जिल्ह्यात 16 पैकी 10 ग्रामपंचायतीवर भाजपाचा बोलबाला


गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून निवडणूक झालेल्या जिल्ह्यातील १६ पैकी १० ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच निवडून आल्याने पुन्हा एकदा भाजपाने जिल्ह्यात आपले वर्चस्व सिद्ध केले असल्याची माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे यांनी या प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.

भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने सर्व विजयी उमेदवारांचे व सरपंच यांचे अभिनंदन करीत भाजपाला निवडून दिल्याबद्दल सर्व मतदारांचेही त्यांनी आभार मानले आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यातील सावंगी, गांधीनगर, चामोर्शी तालुक्यातील घोट व दुर्गापुर धानोरा तालुक्यातील इरुपटोला, मुंझालगोंदी, मुरगाव, गडचिरोली तालुक्यातील पारडी कूपी अहेरी तालुक्यातील खानला तर भामरागड तालुक्यातील मने राजाराम या ठिकाणी थेट सरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणूकीमध्ये भाजपाने बाजी मारली आहे.

सावंगी येथे सौ प्रभाताई मनोज ढोरे, गांधीनगर सौ सपना देवदत्त धाकडे, मुरगाव मारुती ऋषी गेडाम, इरुपटोला मीनाक्षी मोहन सयाम, मुंजालगोंदी रामू मनसाराम उईके, खांदला सौ रोहिणी मुलचंद गावडे, मनेराजाराम सौ शारदा पूजा कोरेत, पारडी कूपी येथे भाजपाचे संजय गजानन निखारे, दुर्गापूर येथे सोनी गणेश मंडल, घोट येथे रूपाली प्रशांत दुधबावरे, तर येथे सरपंच म्हणून विजयी झाले आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post