नराधम बाप:बापाचा पोटच्या मुलीवर बलात्कार, मुलगी 2 महिन्यांची गर्भवती

तासगाव तालुक्यातील एका गावात बापाने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना सामोर आली. ही पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तासगाव पोलिसांनी बापावर बलात्काराचा गुन्हा नोंद केला आहे.

तासगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे तासगाव तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावात आपल्या आईवडील व लहान भावासह ही पीडिता राहत होती. दोन महिन्यांपूर्वी घरी कोणी नसताना बापाने या मुलीवर बलात्कार केला. याबाबत कुणालाही काही सांगू नये, यासाठी त्याने मुलीला धमकावले होते. गुरुवारी या नराधम बापाला शारीरिक त्रास होऊ लागल्याने ताे अल्पवयीन मुलीला घेऊन शासकीय रुग्णालयात गेला होता. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या मुलीने मलाही गेल्या काही दिवसांपासून पोटात दुखत आहे, असे सांगून डॉक्टरांना तपासण्यास सांगितले. त्यानंतर तिच्या प्राथमिक तपासण्या केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले.

अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याने डॉक्टरांनी तातडीने तासगाव पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिस रुग्णालयात दाखल झाल्यानंतर या मुलीचा बाप तेथून पसार झाला. त्यानंतरच पोलिसांना या नराधम बापाच्या कृत्याची माहिती समजली. पोलिसांनी तातडीने नराधम बापाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद केला असून फरारी बापाचा शोध सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post