आई मला मारते, चॉकलेटही चोरते : 3 वर्षाच्या मुलाने केली पोलिसात तक्रार


भोपाळ, :- . मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये 3 वर्षीय मुलाने आपल्या आईविरोधात थेट पोलिसांत धाव घेतल्याची रंजक बाब घडली आहे. हा निरागस मुलगा आपल्या वडिलांसोबत पोलिस चौकीत जातो. त्यानंतर तो पोलिसांकडे आपल्या आईला थेट तुरुंगात डांबण्याची विनंती करतो. तो म्हणतो की, आई मला मारते. त्याचे हे तोतरे बोल ऐकून चौकीच्या अंमलदारांनाही हसू आवरत नाही. प्रकरण बुरहानपूरच्या देडतलाई गावचे आहे. 3 वर्षीय मुलाच्या वडिलांनी सांगितले की, रविवारी दुपारी मुलाची आई त्याला अंघोळ घातल्यानंतर काजळ घालत होती. मुलगा नकार देत होता. त्यामुळे आईने प्रेमाने त्याला एक चापटी मारली. त्यानंतर त्याने रडण्यास सुरुवात केली. मी कसेतरी त्याला शांत केले. पण त्याने पोलिसांकडे आईची तक्रार करण्याचा हट्ट धरला. हे ऐकून आम्हाला हसू आले. तो ऐकत नसल्यामुळे मी त्याला समजविण्यासाठी पोलिसांकडे घेऊन आलो. मुलाचे वडील कियोस्क सेंटर चालवतात. त्यांना मुले 2आहेत. मोठ्या मुलाने आईविरोधात
तक्रार दाखल केली आहे.



चौकी प्रभारींनी मुलाची तक्रार लिहिल्यानंतर त्याला स्वाक्षरी करण्यास सांगितले. त्यावर त्याने आडव्या-उभ्या रेषा मारल्या. त्यावेळीही मुलाचा निरागसपणा पाहून चौकी प्रभारींना हसू आवरले नाही. मुलाच्या वडिलांनी पुढे सांगितले की, चौकी चौकीच्या गेटवरच आम्हाला चौ प्रभारी प्रियंका नायक भेटल्या. त्यांना पाहताच मुलाने त्याच्याकडे जाऊन त्यांचे हात पकडला व आईला तुरुंगात टाका, ती मला खूप मारते. असे सांगितले. हे ऐकून त्या हसल्या. त्यांनी मुलाला विचारले, काय झाले सांग. मुलगा म्हणाला की, आईने मला चापट मारली. ती दररोजच मला मारते. माझ्या चॉकलेटही चोरते. माझे पैसेही चोरते. तुम्ही तिला दाना मुलाच्या या निरागस बकारीमुळे ठाण्यातील सर्वच कर्मचारी हसू लागले.

Post a Comment

Previous Post Next Post