आला रे आला वाघ आला... वाघाच्या हल्ल्यात रामाळा येथील आनंदराव पांडुरंग दूधबळे ठार



आरमोरी :- प्राप्त झालेल्या माहितीनुसार आरमोरी तालुक्यातील रामाळा येथील वाघाच्या हल्ल्यात आनंदराव पांडुरंग दूधबळे वय 55 वर्ष ठार झाल्याची घटना आज अंदाजे सकाळी 10 वाजताच्या दरम्यान घडली.





सविस्तर वृत्त असे आहे की, रामाळा येथील रहिवासी असलेले आनंदराव पांडुरंग दूधबळे वय 55 वर्ष हे आपल्या 5 सहकाऱ्यांसोबत  वैरागड रोडवर असलेल्या  रामाळा बीट   क्रं 14  जंगलामध्ये शिंधी  तोडायला गेले होते. सिंधी तोडत असताना मागेहुन दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून 3 किलोमिटर अंतरावर फरकडत नेऊन त्यांना ठार केले.

व्हिडिओ बघून शेअर करा
👇👇👇👇👇👇👇👇



या हल्ल्यात एक हात आणि मानेचा भाग खाल्ल्याचे तसेच शरीरावर कुठलेही कपडे आढळुन आले नाही असे घटनास्थळी दिसत आहे.



या घटनेची माहिती गावातील नागरिकांना मिळाली असता घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली.

आनंदराव दुधबळे यांच्यासाेबत जंगलात सिंध कापण्यासाठी गेलेल्या दाेन सहकाऱ्यांची सिंध कापून झाली. तेव्हा त्यांनी आनंदरावला मोठमोठ्याने हाक मारली; परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही. तरीही त्यांनी काही वेळ आवाज दिला व शाेधसुद्धा घेतला. त्यानंतर मात्र त्यांना वाघहल्ल्याचा संशय आल्याने दोघेही गावात परतले. सर्व हकीकत सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन शोधमोहीम राबविली असता दुपारी आनंदरावचा मृतदेह सापडला. सिंध कापण्याच्या स्थळापासून जवळपास तीन किमी अंतरापर्यंत वाघाने आनंदरावला फरफटत नेले हाेते.


तसेच या घटनेची माहिती तात्काळ वन विभागाला दिली असता आरमोरी रेंज वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी असल्याची माहिती मिळालेली आहे. प्रेत pm साठी नेेण्यात आले आहे. त्यामुळे या वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे.


Post a Comment

Previous Post Next Post