तूझ्या प्रेमात पडताना


🌹तूझ्या प्रेमात पडताना 🌹

तूझ्या प्रेमात पडतांना
स्वतःला मी विसरलीच होती
तुझ्यात मी गुंतताना
भूल मला पडली होती

वाट विसरली होती सुखाची
अचानक आगमन तुझे झाले
आनंदून बहरते जशी कळी
तशीच मी बहरून आले

छंद तुझाच लागला मला
तुझ्या मिठीत प्रेमाचा विसावा
बाग बहरूदे आपुल्या प्रेमाची
जन्मो जन्मी मला तूच मिळावा

व्हिडियो
👇👇👇👇👇


पंख फुटलेत मला आज
उंच गगणी उडावं वाटते
तूझ्या साथीची गरज आहे मला
कायम तूच सोबत असावं वाटते

स्वभाव माझाही साधा आहे
मला तुझ्यात मिरवून घेशील ना
तूझा हात कायम हातात दे मला
जन्मभर सुख दुःखात साथ मला देशील ना 

सौं रेश्मा. ग बावणे
कळमगाव 🙏7498275238

Post a Comment

Previous Post Next Post