दसऱ्या मेळाव्याआधीच शिंदे-ठाकरे गटात राडा! नाशिक-मुंबई हायवेवर चालत्या वाहनातून अश्लील इशारे, सेनेच्या महिला संतप्त

नाशिक, 05 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटाचा आज दसरा मेळावा होणार आहे. एकीकडे शिंदे गटाकडून बसेस, खासगी वाहनांमधून समर्थकांना मुंबईत आणले जात आहे. तर दुसरीकडे, शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल झाले आहे. यातच आतच नाशिक-मुंबई महामार्गावरुन एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

व्हिडियो
👇👇👇👇👇


नाशिक मुंबई महामार्गावर शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा झाला आहे. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला. तर चालत्या वाहनातून अश्लील इशारे केले, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केला आहे. यामुळे अश्लील इशारे केल्याचा कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच चोप दिला. ही घटना नाशिक मुंबई महामार्गावरील शहापूर जवळ घडली.


Post a Comment

Previous Post Next Post