एका तरुणाने चक्क म्हशीच्या पिल्लावर केला लैंगिक अत्याचार

सध्या इंटरनेटवर खूप आरामात अश्लील साहित्य उपलब्ध होत आहे. नेट च्या अतिवापरामुळे तरुणाई वाम मार्गाला लागत आहे. गुन्हेगारी कडे तरुणाई वळत आहे हे एक वेळा समजू शकते. पण मागील काही दिवसांपासून प्राण्यांसोबत अनैसर्गिक कृत्याच्या अनेक घटना घडत आहे. कधी 65 वर्षाचा म्हातारा कुत्र्या सोबत संबंध बनवतांना पकडल्या जातो तर कधी तरुण घोडी सोबत. आता तर एका तरुणाने म्हशीच्या पिल्लासोबत (रेकड्या) अनैसर्गिक कृत्य केल्याची किळसवाणी घटना समोर आली आहे. सध्या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



पुणे:- दिपक बी. थापा असे आरोपीचे नाव असून थापा वर सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्यावर उपचार पूर्ण झाल्यावर त्याला अटक करण्यात येईल. याबाबत अक्षय हेमंत गुंजाळ (26, रा. गुंजाळवाडा, बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. संबंधीत आरोपीवर अनैसर्गिक कृत्य तसेच प्राण्याचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

27 ऑक्टोबर रोजी फिर्यादी अक्षय गुजाळ आणि त्याचे मित्र सचिन सोनवणे वृध्देश्वर-सिध्देश्वर घाट येथे कॉफी पित असताना रात्री दहा वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी व्यक्तीने त्यांना येऊन सांगितले की, बालगंधर्व पुलाखाली गुरांच्या गोठ्या जवळील एका झाडाला बांधलेल्या म्हशीच्या रेडकुसोबत एक व्यक्ती नैसर्गिक कृत्य करत आहे. त्यानंतर फिर्यादी लागलीचे तेथे गेले. त्यानाही एक व्यक्ती रेडकुसोबत अनैसर्गिक कृत्य करताना आढळून आली.

आरोपीला फिर्यादी येण्याची चाहूल लागताचा तो तेथून पळून जाऊ लागला. त्याचा पाठलाग केल्यानंतर त्याला पकडले असता त्याचे नाव विचारल्यानंतर त्याने त्याचे नाव दिपक असल्याचे सांगून तो नेपाळचा असल्याचे तो म्हणाला. आरोपी फिर्यादीच्या हातातून सटकून तो पुन्हा आंधारातून पळत जात असताना रोडवर पडल्याने त्याला मार लागला. तसेच हा प्रकार जमलेल्या लोकांनाही समजल्याने लोकांनीही त्याला मारहाण केली. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाशी फोन करून त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post