सिरोंचा वनपरिक्षेञात झाली अस्वलाची शिकार.. शिकाऱ्यानी अस्वलाचे चारही पायाचे पंजे व लिंग केले गायब. वनविभाग आरोपीच्या मार्गावर


गडचिरोली/सिरोंचा :-गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनपरिक्षेत्रातील दिनांक 27/10/2022 रोजी वनपरिक्षेत्रातील आरडा नियतक्षेत्र कक्ष क्र. 29PF संरक्षित वनामध्ये पेंटीपाका ते पाटीपोचम्मा बैलबंडी रस्त्यालगत मृत वन्यप्राणी अस्वल असल्याची माहिती सकाळी 8.00 वाजेच्या सुमारास मिळाली.माहीतीनुसार वनकर्मचारी त्वरीत मौक्यावर पोहचून मृत अस्वल शरीराची पाहणी केली असता अज्ञात इसमाने चार ही पायाचे पंजे तसेच लिंग कापुन नेल्याचे मोक्यावर दिसुन आले.आजुबाजुचे परिसराची पाहणी करून तपासणी केली व मोक्यावर मोकापंचनामा व जप्तीनामा नोंदवून भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम 1972 नुसार वनगुन्हा क्रमांक 09/2022 , दि . 27/10/2022 जारी करण्यात आला.मृत्युचे कारण माहिती करण्याकरीता पशुवैद्यकिय अधिकारी सिरोंचा यांचेकडुन मोक्यावर शवविच्छेदन करुन अवयवाचे नमुने सिलबंद करुन नागपूर येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले.


सदर अस्वल हे नर असुन अंदाजे वय 10 वर्ष आहे . मोक्यावरुन मृत अस्वल विद्युत तारेच्या खाली आढळलेले आहे . शिकारी मध्ये विजेचा करंट वापरला असल्याची शक्यता आहे.गुप्त माहिती व चौकशी नुसार संशयीत आरोपी पेंटीपाका तसेच लक्ष्मीपुर ( ता.सिरोंचा ) गावातीलच असल्याचा अंदाज आहे.संशयीत आरोपींच्या शोधार्थ वनकर्मचारी गेले असता सदर संशयीत आरोपी फरार आहेत. आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपये रोख पारितोषीक देण्यात येईल व त्यांचे नाव गुप्त ठेवण्याबाबतचे परिपत्रक वनविभागाकडुन प्रसिध्द करण्यात आले आहे.सदर वनगुन्ह्यात उपवनसंरक्षक सिरोंचा यांचे मार्गदर्शनानुसार तपास सुरु आहे . सदर कार्यवाही पी.एम.पाझारे , वनपरिक्षेत्र अधिकारी सिरोंचा ,एस.एस.निलम वनपाल ,ए.बी. पोटे , वनपाल ,आर.वाय.तलांडी वनरक्षक, आर .एल.आत्राम वनरक्षक, एस.बी. भिमटे वनरक्षक व इतर वनकर्मचारी करत आहेत.पेंटीपाका ते पाटीपोचम्मा बैलबंडी रस्त्यालगत मृत वन्यप्राणी अस्वल असल्याची माहिती सकाळी 08.00 वाजेच्या सुमारास मिळाली .

 वनकर्मचारी त्वरीत मौक्यावर पोहचून मृत अस्वल शरीराची पाहणी केली असता अज्ञात इसमाने चार ही पायाचे पंजे तसेच लिंग कापुन नेल्याचे मोक्यावर दिसुन आले.आजुबाजुचे परिसराची पाहणी करून तपासणी केली व मोक्यावर मोकापंचनामा व जप्तीनामा नोंदवून भारतीय वन अधिनियम 1927 व वन्यजीव ( संरक्षण ) अधिनियम 1972 नुसार वनगुन्हा क्रमांक 09/2022 , दि . 27/10/2022 जारी करण्यात आला.मृत्युचे कारण माहिती करण्याकरीता पशुवैद्यकिय अधिकारी सिरोंचा यांचेकडुन मोक्यावर शवविच्छेदन करुन अवयवाचे नमुने सिलबंद करुन नागपूर येथील प्रयोगशाळेला पाठविण्यात आले . सदर अस्वल हे नर असुन अंदाजे वय 10 वर्ष आहे.मोक्यावरुन मृत अस्वल विद्युत तारेच्या खाली आढळलेले आहे.शिकारी मध्ये विजेचा करंट वापरला असल्याची शक्यता आहे.गुप्त माहिती व चौकशी नुसार संशयीत आरोपी पेंटीपाका तसेच लक्ष्मीपुर ( ता.सिरोंचा ) गावातीलच असल्याचा अंदाज आहे.संशयीत आरोपींच्या शोधार्थ वनकर्मचारी गेले असता सदर संशयीत आरोपी फरार आहेत. आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपये रोख पारितोषीक देण्यात येईल व त्यांचे नाव गुप्त ठेवण्याबाबतचे परिपत्रक वनविभागाकडुन प्रसिध्द करण्यात आले आहे.सदर वनगुन्ह्यात उपवनसंरक्षक सिरोंचा यांचे मार्गदर्शनानुसार तपास सुरु आहे . सदर कार्यवाही पी.एम.पाझारे , वनपरिक्षेत्र अधिकारी सिरोंचा ,एस.एस.निलम वनपाल ,ए.बी. पोटे , वनपाल ,आर.वाय.तलांडी वनरक्षक, आर .एल.आत्राम वनरक्षक, एस.बी. भिमटे वनरक्षक व इतर वनकर्मचारी करत आहेत .


Post a Comment

Previous Post Next Post