हत्तींच्या भीतीने ते गावकरी देताहेत रात्रीचा पहारा



गावाच्या सभोवताल लावल्या आहेत मशाली

 कोरची:-  तालुक्यातील सीमावर्ती भागातील लेकुरबोडी गावात शुक्रवारी रानटी हत्तींच्या कळपाने चांगलाच हैदोस घातला होता. हत्तींनी गावातील दोन घरे नेस्तनाबूत केली होती. यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली. या घटनेमुळे नागरिक दहशतीत वावरत आहेत. पुन्हा हत्ती गावात प्रवेश करतील या दहशतीपोटी लेकुरबोडी व परिसरातील नागरिक रात्र जागून काढत आहेत.

गोंदिया जिल्हा सीमावर्ती भागालगत कोरची तालुक्यातील लेकुरबोडी गावात शुक्रवारी हत्तींच्या कळपाने प्रवेश करीत उच्छाद मांडलाहोता

 यादरम्यान हत्तींद्वारे गावातील दोन घरांची नासधूस करण्यात आली. यात एक वृद्ध महिला गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर हत्ती परत जंगलात पसार झाले. शुक्रवारची रात्र ग्रामस्थांनी हत्तींच्या दहशतीत घालविली. वन विभागाने सदर हत्ती पुन्हा गावात प्रवेश करू नये, यादृष्टीने गस्त घालण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाचे कर्मचारी सेवेत असतानाही गावातील नागरिक हत्तींच्या दहशतीपोटी संपूर्ण दिवस व सायंकाळी उशिरापर्यंत दहशतीतच वावरत असल्याचे निदर्शनास येत आहेत. रात्री हत्ती हल्ला करतील या भीतीने नागरिक रात्र जागून काढत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post