रावण पूजन दरम्यान आदिवासी मुलीला मारहाण

ब्रम्हपुरी : तालुक्यातील भूज (तुकुम) येथे दसऱ्याच्या दिवशी एकीकडे रावण पूजनाचा कार्यक्रम होता. तर दुसरीकडे रावण दहनाची मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान काहींनी पूजनाच्या स्थळाजवळ फटाके फोडल्याने तणाव निर्माण झाला. यात आदिवासी समाजाच्या अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. चुकीचे गुन्हे दाखल करून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नाही. कलमात वाढ करून ३५४ व पास्को दाखल करून आरोपींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा विविध आदिवासी संघटनांनी घेतलेल्या पत्र परिषदेत दिला आहे.

भूज येथे दरवर्षी रावण दहन करण्यात येते. तर आदिवासी समाजाकडून पूजन करण्यात येते. पूजनाच्या ठिकाणापासून दोन्ही बाजूला ५० फुटावर फटाके फोडण्यास बंदी होती. याच कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. एका अल्पवयीन आदिवासी मुलीला मारहाण करण्यात आली. आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रा. प्रकाश वट्टी, अर्चना खंडाते, कवडू प्रेंदाम, अमित कन्नाके, दिलीप कोडापे, घनश्याम कुळामेथे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post