तो पुन्हा आला...ऐन दिवाळीच्या दिवशी नरभक्षी वाघाने घेतला शेतकऱ्याच्या नरडीचा घोट ....


गडचिरोली:- 

ऐन दिवाळीच्या दिवशी नरभक्षक वाघाने शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्याला नरभक्षी वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे दिनांक 24 ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.




प्रभाकर तुकाराम निकुरे वय 60 वर्ष रा. कळमटोला ता. जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. प्रभाकर निकुरे हा शेतात कामानिमित्त गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या वर हल्ला केला व ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतक शेतकऱ्याचा मृतदेह गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम असून ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने निकुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



ऐन दिवाळीच्या दिवशी नरभक्षक वाघाने शेतात कामानिमित्त गेलेल्या शेतकऱ्याला नरभक्षी वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना गडचिरोली तालुक्यातील कळमटोला येथे दिनांक 24 ऑक्टोबर सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.








प्रभाकर तुकाराम निकुरे वय 60 वर्ष रा. कळमटोला ता. जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.


प्रभाकर निकुरे हा शेतात कामानिमित्त गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या वर हल्ला केला व ठार केले. या घटनेची माहिती कळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतक शेतकऱ्याचा मृतदेह गडचिरोली येथील । सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. गडचिरोली तालुक्यात नरभक्षी वाघाची दहशत कायम असून ऐन दिवाळीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने निकुरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.


Post a Comment

Previous Post Next Post