नरखेड रेल्वे स्थानकावर पुर्वरत रेल्वे थांबे मिळण्यासाठी भाजपाचे साखळी उपोषण ::

1) आजपासून साखळी उपोषणास सुरुवात भाजपा कार्यकर्तेचाच भाजपा सरकार वर रोष ::
--------------------------------------

-राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता.4

कोरोना संक्रमणापूर्वी नरखेड काटोल येथे बहुतांश प्रवासी रेल्वे गाड्यांचा थांबा होता. लॉकडाऊन काळात रेल्वे बऱ्याच काळ बंद होत्या. त्यानंतर अलीकडच्या काळात रेल्वेची वाहतूक सुरू झाली. मात्र गाड्यांना नरखेड काटोल येथे थांबा देण्यात आलेला नाही. नरखेड मोवाड काटोल रेल्वे स्थानकावर बहुतांश गाड्यांचे थांबे पुर्ववत करावे या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने साखळी उपोषातून मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता पासून नरखेड रेल्वे प्रवेश द्वारा जवळ जन आंदोलन सुरू करण्यात येत असून भाजपाच लावणार भाजप मुर्दाबादचे नारे असे चित्र आता पावावयास मिळणार आहे नरखेड मोवाड काटोल हे तालुक्याचे ठिकाण असून शहरातील चेन्नई नवी दिल्ली रेल्वे मार्ग जातो. या मार्गावर धावणाऱ्या बहुतांश प्रवासी गाड्यांना नरखेड येथे मागील अनेक वर्षांपासून रीतसर थांबा देण्यात आला होता. कोरोना संपल्या नंतर ही बहुतांश प्रवाशी गाड्यांना नरखेड मोवाड काटोल येथे पूर्ववत थांबा देण्यात आला नाही.भाजपा कार्यकर्तेनी कित्येक वेळा रेल्वेमंत्री, नितीन गडकरी, रेल्वे अधिकारी यांना दिल्ली पर्यंत निवेदन दिले पण आश्वासन शिवाय काहीच प्रतिसाद मिळाला नाही आखिर थेट भाजपा विरोधात साखळी आंदोलन करण्याची वेळ या भाजप कार्यकर्ते वर आली आहे. रेल्वे शासनाच्या या आडमुठे धोरणांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. नरखेड मोवाड काटोल शहरातील नागरिकांच्या हितासाठी हे अहिंसात्मक आंदोलन उभे करत आहोत. सदर जनआंदोलनासाठी सर्व जनतेचा, व्यापारी संघटनेचा, सामाजिक संस्थेचा, सर्व राजकीय पक्षाचा सहभाग आणि पाठिंब्याची निश्चितच आवश्यकता असून या जन आंदोलनात नरखेड, मोवाड, काटोल,सावरगाव, खैरगांव, बेलोना आदी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post