केला रे केला...ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक कामात प्रशासकाने केला लाखोंचा भ्रष्टाचार .

 

👉 प्रशासनाने कारवाई करण्यास दिरंगाई केल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

👉 राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन.

गडचिरोली / प्रतिनिधी. दि. ३०/१०/२०२२:-


गडचिरोली :- जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील सावंगी येथे सन २०२० ते सुरू असलेल्या २०२२- २३ या आर्थिक कालावधीत नेहमीच वादग्रस्त असलेल्या जातियवादी, स्व:र्थासाठी वादग्रस्त असलेल्या आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यात असलेले प्रशासक उमेश चिलबुले यांनी अनेकविध कामात प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार केला असुन त्यांचेवर सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सात दिवसात योग्य चौकशी करून कारवाई करावी. अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन गडचिरोली जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
२०२० ते सुरू असलेल्या २०२३ या आर्थिक वर्षातील विकास योजना आणि विविध प्रकारच्या ग्राम विकास योजना राबविण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या उमेश चिलबुले या वादग्रस्ताकडे दिली.

सावंगी, गांधी नगर गटग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत सावंगी अंतर्गत पिण्याच्या पाण्याची आर. ओ. मशीन, सार्वजनिक शौचालय, जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या अंगणवाडी बांधकाम , मृतदेह विसावा, या सारख्या अनेक कामात गैरव्यवहार केला असून त्यांचेवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी भिम टायगर सेना गडचिरोली च्या वतीने करण्यात आली आहे. नालीवर कव्हर लावलेले नसतांना सुद्धा शासनाची दिशाभूल करुन लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट दिसत आहे. गांधीनगर येथे झालेल्या विविध बांधकामात प्रशासक उमेश चिलबुले यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे. झालेल्या बांधकामाची कोणत्याही प्रकारची माहिती आणि हिशोब मांगु नये म्हणून प्रशासक चिलबुले यांनी गावातील 5 - 10 लोकांना हाताशी घेऊन गावातील ईतर लोकांना " मी संघटनेच्या पदाधिकारी आहे. " माझे कोणीही काही करू माझे शकत नाही, जिल्हा परिषदेचे सिओ, असोत की कलेक्टर असोत की बीडीओ राहो माझे काहीच बिगडऊ शकत नाही अशा अहंकारी भाषेत दमदाटी करून दबाव टाकला जातो. या बाबत प्रशासनाने सात दिवसात योग्य चौकशी करावी अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा मा. जिल्हाधिकारी , जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी भिम टायगर सेनेचे वडसा तालुकाध्यक्ष अंगराज शेंडे, महिपाल बन्सोड, सागर मेश्राम, मिलिंद बावणे , अश्विन मेश्राम, मंगेश हनवते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post