मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन आणि बालपंचायत तर्फे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा*

चंद्रपूर:-:मॅजिक बस संस्थेचे वरीष्ठ अधिकारी मा. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर तालुक्यातील जि. प. उच्च. प्राथ. शाळा चीचपल्ली ,. जि. प. उच्च. प्राथ. शाळा पिंपळखुट, जि. प. उच्च. प्राथ. शाळा घुगुस (कन्या) ,. जि. प. उच्च. प्राथ. शाळा (हिंदी), जि. प. उच्च. प्राथ. शाळा म्हातारदेवी, प्रियदर्शनी कन्या विद्यालय घुगूस, जि. प. उच्च. प्राथ. शाळा चींचाडा,जि. प. उच्च. प्राथ. शाळा वेंडळी , जि. प. उच्च. प्राथ. शाळा वरवट, जि. प. उच्च. प्राथ. शाळा WCL दुर्गापूर, अश्या अनेक शाळेमध्ये आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्यात आला. 


दर वर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा 11 ऑक्टोंबर ला साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा उद्दिष्ट्य म्हणजे मुलींना सक्षम बनविणे , त्यांच्या आवाजांना प्रोत्साहन देणे , किशोरवयीन मुलींची क्षमता आणि कौशल्य ओडखून त्यांच्या साठी अधिक संधी उपलब्ध करण्यासाठी प्रोत्साहित करते. तसेच बालविवाह , शिकण्याच्या कमी संधी,हिंसा,आणि भेदभाव ,यासह जगभरातील लहान मुलींना तोंड द्यावे लागणारे लिंगाधारीत आव्हाने दूर करण्यासाठी हा दिवस नियुक्त केला जातो .दर वर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिवस थीम नुसार साजरा केला जातो . या वर्षी 2022 ची थीम *आता आमची वेळ आहे - आमचे हक्क* ही आहे. 


बालिका दिवस साजरा करण्यासाठी गावामधे भव्य रॅली, काढण्यात आले. वेगवेगळे गेम, ॲक्टिविटी घेण्यात आले. त्यात रीले रेस, पोट्याटो रेस, वॉटर गेम, पोस्टर मेकिंग, यासारखे ॲक्टिविटी घेण्यात आले. यानंतर विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित जि. प. उच्च. प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक , केंद्रप्रमुख, शिक्षवृंद, पालकवर्ग होते. मॅजिक बस संस्थेचे शाळा सहाय्यक अधिकारी नालंदा बोथले , पायल राजपूत, संदेश चूनारकर, गणेश दुधबळे ,सतीश खंडारे , गंगाधर जाधव ,यांच्या सहकाऱ्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.


Post a Comment

Previous Post Next Post