रामदास आठवलेंच्या त्या वक्तव्याचे देसाईगंज शहरात तिव्र पडसाद , आंबेडकरी जनतेने प्रतिमेचे दहन करुन रामदास आठवलेंचा निषेध केला

 
राजरत्न मेश्राम देसाईगंज प्रतिनिधि

व्हिडिओ जरूर बघा
👇👇👇👇👇




देसाईगंज :-  केंद्रीय समाजकल्यान राज्यमंञी नाम रामदास आठवले यांनी दि ४ च्या पञकार परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इच्छा नसतांना बौद्ध धम्म स्विकारला या वक्तव्याचे तिव्र पडसाद देसाईगंज येथे उमटले असुन आंबेडकरी जनतेने देसाईगंज येथिल फव्वारा चौकात आज दि ६ ला सायंकाळी रामदास आठवलेंच्या धिक्काराच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले .


व्हिडिओ जरूर बघा
👇👇👇👇👇👇


 सविस्तर वृत्त असे की धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पुर्व संध्येला केंद्रिय राज्यमंञी रामदास आठवले यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या धर्मांतराविषयी अतिषय निंदनिय असे वक्तव्य केले प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना आठवले म्हणाले की बाबासाहेंना हिंदु धर्म सोडायचा न्हवता इच्छा नसतांना बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्विकारला हा विषय प्रसारमाध्यमात प्रसारित होताच देसाईगंज येथिल बौद्ध समाज कोअर कमेटी च्या वतिने समाज बांधवांना एकञित आनुण या वक्तव्याचा निषेध नोंदविण्याची भुमिका घेतली या साठी विजय बन्सोड डाकराम वाघमारे राजरतन मेश्राम प्रकाश सांगोळे यांचेसह बौद्ध समाज कोअर कमेटीच्या सर्व सभासदांनी देसाईगंज शहरातिल जनतेला एकञ येण्याचे आवाहन करताच अ्ड बाळकृष्ण बांबोळकर अशोक बोदेले जगदिश बद्रे नरेन्द्र मेश्राम कुशाबराव लोणारे हंसराज लांडगे साजन मेश्राम दिलिप उके बोदेले सर मिना शेंडे द्रोपदी सुखदेवे कल्पना वासनिक यांचेसह शेकडो समाज बांधवांनी देसाईगंज येथिल फव्वारा चौकात उपस्थित होउन रामदास आठवले यांच्या धिक्काराच्या घोषना देत प्रतिमेचे दहन केले एके काळी आंबेडकरी विचाराची सिंहगर्जना म्हनुण ओळख असलेल्या रामदास आठवले यांनी सत्तेसह प्रतिगामी विचारसरणींचे मांडलिकत्व स्विकारले असल्याचे दिसुन येत असल्याचे वक्तव्य आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते अशोक बोदेले यांनी या धिक्कार सभेत व्यक्त केले या सभेला देसाईगंज शहरातिल आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता 


Post a Comment

Previous Post Next Post