लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार केल्याची घटना नागपूरात समाेर आली आहे.



#nagpur #nagpurcity #nagpurnews #NagpurPolice #CrimeNews #rapenews #RapeCase #satarkpolicetimes







नागपूर - लग्नाचे आमिष दाखवून एका युवतीवर अत्याचार केल्याची घटना नागपूरात समाेर आली आहे. संबंधिताने युवतीस पाच लाख रुपयांना फसविल्याचं तिने पाेलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. दाेघांची एका लग्न जुळविणा-या संकेतस्थळावर भेट झाली हाेती. यावेळी युवकानं आपण लोको पायलेट आहे असं भासवून युवती आणि तिच्या कुटुंबाची फसवणूक केल्याचे तिने म्हटलं आहे. (लग्न जुळवण्यासाठी असलेल्या संकेतस्थळावर बरीच तरुण तरुणी हे संकेतस्थळावरती आपले संपूर्ण माहिती अपलोड करतात आणि त्यानंतर अनेक तरुणींची फसवणूक झालेले उदाहरण आपण पाहिलेले आहे. नागपूरमध्येही गणेश पेठ पोलीस स्टेशन अंतर्गत असाच एक प्रकार उघड झालेला आहे. लग्नाचे आमिष दाखवून एका व्यक्तीने तरुणीशी संबंध प्रस्थापित करून पाच लाख रुपयांची फसवणुक केली आहे.सत्यसमोर आल्यानंतर तरुणीने गणेश पेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली.






 त्यानंतर संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत म्हणाले संबंधित संशयित आराेपी हा भोपाळ येथील रहिवासी आहे.पीडित तरुणीने लग्नासाठी तिची संपूर्ण माहिती एका विवाह संकेतस्थळावरती अपलोड केली.संबंधित तरुणी ही एक हॉस्पिटलमध्ये काम करते. बदली करून घेण्याची वेळ संपल्यानंतर पीडित तरुणीने संशियतावर लग्नासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. तिने पैसे मागितले. त्यावेळी युवकानं टाळाटाळ केली. त्यामुळे तिला संशय आलं आणि तिने चौकशी केल्यानंतर त्याचे लग्न झाले असल्याचे तिला समजले. या धक्क्यातून तिने पोलीस ठाणे गाठले आणि त्याच्या विराेधात तक्रार दाखल केली. संबंधित युवकावर अत्याचारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक बाबुराव राऊत यांनी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post