मानव समानता हिच बौध्द धम्माची ओळख : प्राचार्य डॉ.विनोद चहारे



कोटरा येथे ६६वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा उत्साहात साजरा.

कोरची
          बौद्ध धम्मात भेदभाव नाही या धम्मामध्ये सर्वच मानव समान आहेत. त्यामुळे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सात लाख अनुयायांसह बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हा दिवस विजयादशमीचा असून सम्राट अशोकांनी देखील बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. बौद्ध धम्मात भेदभावाला मुळीच स्थान नाही. त्यामुळे बौद्ध धम्म की क्या पहचान मानव मानव एक समान असे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. विनोद चहारे यांनी ६६ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने गावातील बौद्ध बांधवांना मार्गदर्शन केले.
       कोटरा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने पंचशील ध्वजाचे ध्वजारोहन कोटरा येथील पोलिस पाटील लिनाताई तांडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास गावंडे, दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे तालुका कोरचीचे अध्यक्ष आनंदराव मेश्राम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. विनोद चहारे तर प्रमुख अतिथी कोरची तालुका लोकमत प्रतिनिधी राहुल अंबादे, शिक्षक रमेश नांने, मुकेश हरडे, यशवंतराव सहारे, रामा चौधरी, मोतीराम मडावी, देवानंद पुराणकर, खिरेश ढवळे, रमेश सहारे, मोतीराम मोहुर्ले, घनश्याम वणवे, नमो मेश्राम, मच्छरके सर, सुमन सहारे, किसन शेंडे, परमेश्वर गायकवाड उपस्थित होते.
          धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने कोटरा येथील बौद्ध बांधवांनी गावातून डीजेच्या गजरात भीम रॅली काढली होती यानंतर बौद्ध स्थळी एकत्रित झाले यानंतर उपस्थित मान्यवरांनी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलित पुष्प व माल्यार्पण केला. तसेच पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण झाल्यानंतर सर्व बौद्ध बांधवांनी त्रिशरण पंचशील अष्टगाथा सामूहिकपणे ग्रहण केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक नमो मेश्राम, संचालन रमेश सहारे तर आभार विनोद चौरे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता शेवटी अल्पोपहार घेऊन झाली या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ग्राम शाखा कोटरा यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post