ग्रामपंचायतने केला लाखोचा भ्रष्टाचार



गोंदिया :-  तालुक्यातील खातिया ग्राम पंचायतीच्या विविध लेखा शिर्षकातंर्गत असलेल्या निधीचे सरपंच, सचिवाने संगनमत करून अपहार केले. तसेच शासनाची दिशाभूल केली आहे. हे प्रकरण २२ फेब्रुवारी २०१९ ते १० जानेवारी २०२२ पर्यंतचे आहे. या प्रकरणी खंडविकास अधिकारी डॉ. चौरागडे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिस ठाण्यात सरपंच, सचिवाविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे गावातील राजकारण चांगलेच तापले आहे.




सविस्तर असे की, ग्राम पंचायत ही संस्था गावातील प्रमुख संस्था आहे. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी या संस्थेमार्फत निधी खर्च केला जातो. त्याचबरोबर अनेक योजनांची अंमलबजावणी ग्राम पंचायतीच्या माध्यमातन केली जाते. यासाठी स्वच्छ भारत मिशन, मग्रारोहयो, ग्रामनिधी, पाणी पुरवठा निधी आणि ग्राम पंचायतीला प्राप्त होणाऱ्या इतर अभिलेखातंर्गत निधीची विल्हेवाट सरपंच व सचिवाने परस्पर संगनमत करून घेतली. दरम्यान पदाचा दुरूपयोग करून शासनाच्या दस्ताऐवज प्रमाणे खर्च न करता १लाख २० हजार रूपये परस्पर खर्च करून घेतले. त्याचबरोबर ३२ लाख ४ हजार ६१८ रूपयाच्या खर्चाची अभिलेखात नमुद न करता अनियमितता असल्याचे लेखा परिक्षणातून समोर आले आहे. एवढेच नव्हेतर १ लाख १२ हजार २५२ रूपये बँकेतून परस्पर काढून घेतल्याचाही प्रकार समोर आला आहे. लेखा परिक्षणाच्या अहवालावरून गटविकास अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिस ठाण्यात सरपंच, सचिव या दोघांविरूध्द कलम ४२०, ४०९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बाबासाहेब सावदे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post