गणेशपूर येथे आशा वर्करची गळफास घेऊन आत्महत्या

सुसाईड नोट पोलिसांच्या हाती


 भंडारा : शहरी आरोग्य केंद्रात आशा वर्करमधून कार्यरत असलेल्या एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरालगतच्या गणेशपूर येथे मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. सुसाईड नोट पोलिसांच्या हाती लागली असून, त्यावरून पुढील कारवाई होणार आहे.

व्हिडियो
👇👇👇👇



मंगला अशोक थोटे (४७, रा. सुभाष वॉर्ड, गणेशपूर) असे मृत आशा वर्करचे नाव आहे. त्या भंडारा येथील शहरी आरोग्य केंद्रात आशा वर्कर म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी दुपारी त्यांनी घराच्या मागच्या बाजूला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस येताच भंडारा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post