अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ म्हणत तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला झाली दीड वर्षाची शिक्षा

मुंबई : अल्पवयीन मुलीला ‘आयटम’ म्हणत तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला दीड वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील पोक्सो न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एखाद्या मुलीला उद्देशून ‘आयटम’ हा शब्द वापरला जातो, हे मुलीचे लैंगिक शोषण मानले जाईल. असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.





टाईम्स ऑफ इंडिया दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना 2015 मधी घडलेली आहे. 16 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी शाळेतून घरी जात होती. तेव्हा वाटेत एका तरुणाचे तिचा विनयभंग केला. या तरुणाने तिची छेड काढच तिला आयटम असं संबोधलं होतं. ‘क्या ‘आयटम’ कहाँ जा रही है?’ अस तिला म्हणाला होता.










हे प्रकरण न्यायालयात आल्यानंतर त्यावर सुनवणी पार पडली. अशा रोडसाइड रोमिओंना धडा शिकवणे आवश्यक आहे. असं निरीक्षण न्यायलयाने नोंदवत त्याला दोषी ठरवले. मुलीच्या पालकांना तरुणाने त्यांच्या मुलीसोबत केलेली मैत्री आवडत नसल्यामुळे त्यांना या प्रकरणी अडकविण्यात आले. या प्रकरणी आपल्याला चुकीच्या आरोपांखाली अडकवलं गेल्याचा आरोप आरोपीने केला होता.

न्यायलयाचं म्हणणं काय?
एखाद्या मुलीला आयटम असं म्हणून बोलवणं एखाद्या लैंगिक शोषणाहून कमी नाही, असं म्हणत पोक्सो न्यायालयाने एका आरोपीला दीड वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एका 16 वर्षांच्या मुलीवर अश्लील टिप्पणी करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा ठोठावण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post