काष्ट्राईब वन विभाग संघटनेच्या अध्यक्ष पदी नामदेव बनसोड

 गडचिरोली. काष्ट्राईब वनविभाग कर्मचारी संघटना गडचिरोली (सलग्न काष्ट्राईब कर्मचारी महासंघ म. रा. नागपूर ) चे वतीने दिनांक १ ऑक्टोबर २०२२ रोज शनिवारला दुपारी १.०० वाजता जंगल कामगार संस्था चे कार्यालय धानोरा रोड गडचिरोली येथे सत्कार व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेचे अध्यक्ष स्थानी आयु.प्रभाकर सोनडवले सरचिटणीस म. राज्य नागपूर हे होते तर सत्कारमूर्ती आयु. रविकुमार वाकळे से.नी. सहाय्यक वनसंरक्षक आणि मार्गदर्शक म्हणून गंगाधर मडावी अध्यक्ष कर्मचारी महासंघ गडचिरोली तर प्रमुख अतिथी म्हणून चक्रपाणी कन्नाके सर अध्यक्ष शिक्षक संघटना व देवानंद फुलझेले सा.अध्यक्ष ग्रामसेवक संघटना हे होते. कार्यक्रमामध्ये रविकुमार वाकळे सा. से. स.वन संरक्षक यांचा सेवा निवृत्तीपर शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे श्री. घनश्याम जक्कुलवार से.नी. वनपाल यांचा सत्कार करण्यात आला. प्रभाकर सोनडवले यांची राज्याचा सरचिटणीस पदी नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या अध्यक्षपदी श्री. नामदेव बनसोड सा.वनीकरण यांची लोकशाही पध्दतीने निवड करण्यात आली. त्यानंतर नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशना बाबत सविस्तर माहिती गंगाधर मडावी यांनी सांगितली व त्या बाबत नियोजन करण्यात आले. कन्नाके सरं, फुलझेले सा. यांनी काष्ट्राईब संघटनेची वाटचाल आणि स्वतःचे अस्तित्व जपणारी संघटना म्हणजे काष्ट्राईब संघटना होय. असे विचार मांडले. 
        तर वाकडे सा. यांनी वन विभागातील सर्व अधिनस्त कर्मचारी यांचे मुळेच मी या पदावर पोहचून उत्तम कार्य करता आले अशी भावना व्यक्त करून सत्करा बाबत संघटनेचे आभार मानले. अध्यक्ष पदावरून बोलताना आयु. प्रभाकर सोनडवले यांनी संघटनेतील कर्तृत्व व न्याय मिळवून देण्याचा माझ्यात प्रामाणिक पना असल्याने मला माझ्यातील नेतृत्व गुण ओळखून माझी राज्याच्या सरचिटणीस पदी नियुक्ती झाली. हे मी माझ्या मातृभूमी गडचिरोली मुळे शक्य झाले. मी राज्याच्या पदावर असलो तरी मी तळगाळा तल्या कर्मचाऱ्यांचे कोणतेही काम करण्यास सदैव तत्पर राहीन असे आश्र्वासन त्यांनी या वेळेस दिले.
         तर नव नियुक्त अध्यक्ष बनसोड यांनी मी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. वक्तशीरपणा, शिस्त आणि पारदर्शकता यानुसार संघटनेची वाटचाल राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सभेचे प्रस्तावाईक सिद्धार्थ गोवर्धन सरचिटणीस व रमेश घुटके कार्याध्यक्ष यांनी केले तर संचालन सुधीर वेटे यांनी तर आभार नितेश सोमलकर यांनी मानले. सदर सभा सुनील देठे अध्यक्ष गडचिरोली वन विभाग यांचे नेतृत्वात घेण्यात आली. या सभेकरिता एस. एस.खोब्रागडे, विनोद धात्रक ,विजय कंकलवार, राजेश दुर्गे, नरेश टोगे, श्यामराव हजारे.रुपेश आनंदपवार,जितेंद्र सोरदे, दिलीप मल्लेलवार,दिनेश तेलंग,कैलास अम्बादे, हेडो सा,मंगेश कन्नाके ,हिराजी अम्बादे,निता चंदावार, खलीता कुकडकर, रंजना तलांडी,मनीष मेश्राम, नरेश रामटेके, भास्कर खोब्रागडे, यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post