वनश्री महाविद्यालयात महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

कोरची- वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय कोरची येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. विनोद चहारे हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. आर. एस. रोटके, प्रमुख पाहूणे म्हणून् प्रा. सी. एस. मांडवे, प्रा. पी. के. चापले, डॉ. एम. डब्लू रुखमोडे, प्रा. धिकोडी व प्रा. वालदे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. धिकोडी यांनी केले. यावेळी प्रा. आर. एस. रोटके व डॉ. विनोद चहारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व गांधीजीनी दिलेला संदेश व्यवहारात आणून आपला गाव, आपला परिसर व आपले महाविद्यालय स्वच्छ व सुंदर ठेवण्याबाबत आवाहन केले. कु. माहेश्वरी भक्ता हिने उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला.


Post a Comment

Previous Post Next Post