लॉयड्स मेटल अँड एनेरजि कंपनी सुरजागड लोह खाणी तर्फे विविध जिवनापयोगी वस्तू वाटप



-कंपनी व्यवस्थापणेने जोपासली सामाजिक बांधिलकी....

संपादक -डॉ. जगदिश वेन्नम

एटापल्ली :- एटापल्ली तालुक्यात लॉयड्स मेटल एनेरजि कंपनि सुरजागड आयर्न ओर माइन्स तर्फे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून विविध गावातील नागरिकांना सोलर फॅन, मच्छरदानी, सोलर लाईट, ब्लॉकेट, टी-शर्ट, स्कूल बॅग असे संसार उपयोगी वस्तू नेंडर येथे ६५, आलेंगा येथे ५२, पुरसलगोंदी येथे ११५, हिद्दूर २२, सुरजागढ येथे ४५, हेडरी ११५, मंगेर येथे ६८,बोडमेटा-55,ऍडसगोंदी-48,बांडे-86,गोडेली-30इतुलणार-26,मलमपाड-43 वाटप कंपनीचे मान्यवर व उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.



लॉयड्स मेटल अँड एनेरजि कंपनी दरवर्षी सामाजिक उपक्रमाच्या उद्देशाने समाजाप्रती काही देणे असलेली बांधिलकी जोपासून उपक्रम राबवीत असते.अशाच प्रकारे कंपनीतर्फे एटापल्ली तालुक्यातील विविध शाळांना स्कुल बॅग व टी-शर्टचे वाटप करण्यात आले.
वाटप करतेवेळी कंपनीचे अधिकारी, कर्मचारी गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचे हस्ते वितरण करण्यात आले या प्रसंगी गावातील नागरिक, वृंद व कंपनीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
लॉयड्स मेटल अँड एनेरजि कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी , कर्मचारी यांनी सामाजिक कार्यात काही गावांत नदी-नाले ओलांडून दिवस-रात्र मेहनत करून अति उत्तम मोलाची कामगिरी केली आहे. सदर वस्तू वाटप केल्याने गावातील नागरिक खूप आनंदी झाले व लॉयड्स मेटल कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post