कामगार वर्गांनी आपल्या संविधानीक हक्कासाठी लढा उभा करावे:- डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे यांचे प्रतिपादन

 गडचिरोली:- दिनांक ९/१०/२०२२ रोज रविवार ला रमाई सभागृह साई नगर वार्ड न.४ गडचिरोली येथे कामगार प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सि .एम.अंबादे जिल्हा अध्यक्ष बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ गडचिरोली
सरचिटणीस:-वसंत चापले
सचिव:-भगवान साखरे
प्रमुख मार्गदर्शक:-डा नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे विभागीय अध्यक्ष बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघ
आदि मान्यवर मंचावर उपस्थित होते.

  डॉ नामदेव खोब्रागडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले,"संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दारीद्रतेचे व गरीबीच्या चटक्याची दाहकता अनुभवली होती.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी१) दगड कापणे,फोडणे, बारीक चुरा करणे  
लादी किंवा टाईल्स कापणे व पालीस करणे 
२)रंग ,वार्निश लावणे, सुतार काम करणे 
३)गटार व नळजोडणीची कामे
४) वायरिंग, वितरण,तावदान बसविणे
५) अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे
६) वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे
७) लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे
अशा कितीतरी अंगमेहनतीने व मरण यातनाची कामे करून आपल्या जिवाची राख रांगोळी करून कसेबसे जीवन व्यतीत करतात याची संपूर्ण कल्पना होती.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मजूर मंत्री असताना,"या देशाला सुंदर व सुशोभिवंत करणाऱ्या व आपल्या शरीरातील रक्ताचे पाणी करून व आपल्या शरिरावरील घाम व अश्रू ला प्राशन करून या देशात मोठ मोठ्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या आहेत.तरी यांच्या वाट्याला आनंद , समाधान व सुखाचे जीवन येण्याऐवजी क्लेशदायक, दैन्यावस्था, मातीमोल,व मरणयातनाचे जीवन येणे हे देशहिताच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे, असे आंबेडकर यांच्या लक्षात आले होते.म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर हे ब्रिटिश कालीन शासन व्यवस्थेत मजूर मंत्री असताना या देशातील संघटीत व असंघटित कामगार देशभक्तांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या.आणी संविधानाच्या लिखाणाची सुत्रे हाती आल्यानंतर संघटन संघर्ष संप व मानव अधिकार या साऱ्या मानव अधिकार व मानवी कल्याणाचे हक्क या साऱ्या कामगार कायदे यांची माहिती संविधानात पहायला मिळते."

म्हणून आपण सारे कामगार जात पात, धर्म बाजूला ठेवून सविधानीक कामगार कायदे यांच्या संरक्षण करण्यासाठी व कामगार यांच्या उत्कर्षासाठी अंमलबजावणी करण्यासाठी शासन व प्रशासन यांचे वर दबाव आणून अंमलबजावणी करण्यासाठी भाग पाडणे आणि कामगारांच्या कल्याणासाठी असणाऱ्या सर्व योजनांची जाग्रूती करणे यातच कामगारांचे हित आहे. असे डॉ नामदेव वसंताबाई भिकाजी खोब्रागडे यांनी मार्गदर्शन केले.
 


या प्रसंगी बहुजन अंसटीत कामगार आघाडी संघ नोंदणीकृत गडचिरोली जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. 
१) अध्यक्ष:- सी.एम. अंबादे
२) सरचिटणीस:- वसंत चापले
३) जिल्हा संघटक: डॉ.जगदिश वेन्नम 
४) सचिव: भगवान साखरे
५) कार्याध्यक्ष: परिमल बाकची
६) उपाध्यक्ष: ईश्वर अलगमकार
७) कोषाध्यक्ष: मनोज नंदेश्वर

सदस्य:१) महादेव सरकार
           २) वसुधा ढ़ोक वडसा     

                
              तालुका अध्यक्ष 
              तालुका उपाध्यक्ष: ‌
दर्शना मोटघरे 

४) गणिका कोवे: गडचिरोली तालुका अध्यक्ष
५) मिनाक्षी भुरसे: महीला आघाडी जिल्हाध्यक्ष

या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सी.एम .अंबादे यांनी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येतात आणि त्या संघटनेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने प्राप्त करायचे याची योग्य माहिती दिली.
संचालन मा.बाकची व आभार प्रदर्शन भगवान साखरे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post