तलाठी आणि मंडळ अधिकारी अँटी करप्शन च्या जाळ्यात

अमळनेर: तक्रारदार यांचा अमळनेर शहरात व अमळनेर तालुक्यात बिल्डींग मटेरीयल सप्लायर्सचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे 3 डंपर आहेत व करारनामा तत्वावर विकत घेतलेले 3 डंपर आहेत. त्यापैकी करारनामा तत्वावर विकत घेतलेले डंपर क्रं.MH18 AA 1153 हे अमळनेर शहरात माती वाहतूक करतांना सुमारे 2 महिन्यापुर्वी तहसिल कार्यालय अमळनेर येथे जमा करण्यात आलेले होते

आरोपी गणेश राजाराम महाजन,वय-४६ वर्ष, व्यवसाय-नोकरी, तलाठी, अमळनेर शहर. रा.नविन बस स्टॅण्डजवळ, पाळधी, ता.धरणगाव जि.जळगाव वर्ग-३ चे आरोपी दिनेश शामराव सोनवणे, वय-४८ वर्षे, व्यवसाय-नोकरी, मंडळ अधिकारी,अमळनेर रा.फरशी रोड,अमळनेर, यांनी संगमताने केली लाचेची मागणी.


सदरचे डंपरवर कारवाई न करता सोडण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे आलोसे क्रं.1 व 2 यांनी पंचासमक्ष 1,50,000/-रुपये लाचेची मागणी केली, व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम 1,50,000/-रुपये आरोपी क्रं.1 यांनी तलाठी कार्यालय अमळनेर येथे पंचांसमक्ष स्वीकारली म्हणून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, पुढील तपास अधिकारी, पो. नि. एन. एन. जाधव हे करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post